Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अल्पवयीन मुलीवरील अत्याचारातील आरोपी डॉक्टरला फाशी देण्याची विहिंप, दुर्गावाहिनीची मागणी
गुन्हेगारी

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारातील आरोपी डॉक्टरला फाशी देण्याची विहिंप, दुर्गावाहिनीची मागणी

काल, १० एप्रिल रोजी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गावाहिनीच्या संगमनेर शाखेच्या वतीने याबाबत निवेदन देण्यात आले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/04/2025Updated:11/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. ११ एप्रिल – प्रतिनिधी
संगमनेर शहरात एका डॉक्टरने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी डॉक्टर अमोल कर्पे याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती आरोपी डॉक्टरकडे उपचारासाठी गेली असताना हा घृणास्पद प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित पाऊले उचलत आरोपीला नाशिकमधून बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्राची प्रतिमा मलिन झाली असून, समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.विश्व हिंदू परिषद दुर्गावाहिनी या संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. संघटनेने आरोपी डॉ. अमोल कर्पे याचे वैद्यकीय लायसन्स आणि त्याच्या रुग्णालयाचे परवाने तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. यासोबतच, आरोपीला कठोर शिक्षा, म्हणजेच फाशीची शिक्षा देण्याची मागणी दुर्गावाहिनीने केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी डॉक्टरचा यापूर्वीचा इतिहासही संशयास्पद आहे. त्याच्यावर यापूर्वीही अशाच प्रकारचे गंभीर आरोप झाले होते, मात्र ते तक्रारींपर्यंत पोहोचले नव्हते. या वेळी मात्र, पीडितेने हिंमत दाखवत तक्रार दाखल केल्याने हे प्रकरण उघडकीस आले असून, आरोपीला आता न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागत आहे.
या घटनेने केवळ संगमनेरमध्येच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनीही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आरोपी डॉक्टरला कठोर शिक्षा देण्याची आणि वैद्यकीय क्षेत्रातील अशा अनैतिक व्यक्तींवर कडक नियंत्रण ठेवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत असून, पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व आवश्यक पाऊले उचलली जात आहेत. काल, १० एप्रिल रोजी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गावाहिनीच्या संगमनेर शाखेच्या वतीने याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी दुर्गावाहिनी संगमनेर शहर संयोजिका ॲड. सोनाली बोटवे, जिल्हा सहसंयोजिका शामल बेल्हेकर, दिपाली वाव्हळ आणि सौम्या बेल्हेकर उपस्थित होत्या.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,615
अमोल कर्पे अल्पवयीन मुलीवर अत्याचार दुर्गावाहिनी निवेदन मागणी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी…

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.