Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अनधिकृत बांधकामांवरील शास्ती कर माफीसाठी आमदार सत्यजीत तांबेंचा पाठपुरावा सुरूच; शासनाकडून दिलासा, पण पूर्ण नाही!
राजकारण

अनधिकृत बांधकामांवरील शास्ती कर माफीसाठी आमदार सत्यजीत तांबेंचा पाठपुरावा सुरूच; शासनाकडून दिलासा, पण पूर्ण नाही!

दरम्यान आमदार सत्यजीत तांबे यांनी या मागणीचा पाठपुरावा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/04/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई

नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवरील शास्ती कर सामान्य नागरिकांसाठी अन्यायकारक असल्याचे सांगत आमदार सत्यजीत तांबे यांनी या मुद्द्यावर विधिमंडळात आणि शासनाकडे सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या पाठपुराव्याला शासनाने काहीसा दिलासा दिला असला, तरी अनधिकृत बांधकामांवरील शास्ती कर माफीबाबत अद्याप स्पष्ट निर्णय न घेतल्याने तांबे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सत्यजीत तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी २१ डिसेंबर २०२४ च्या हिवाळी अधिवेशनात आणि १६ मार्च २०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शास्ती कर रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच, ८ एप्रिल २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यांच्या या मागणीला मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

मात्र काल (मंगळवारी) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शासनाने थकीत घरपट्टीवरील दंडात्मक शास्तीमध्ये ५० टक्क्यांपर्यंत माफीचे अधिकार नगरपालिकांना दिले आहेत. ५० टक्क्यांपेक्षा अधिक माफीसाठी प्रस्ताव शासनाकडे सादर करावा लागणार आहे. मात्र, अनधिकृत बांधकामांवरील शास्तीबाबत कोणताही स्पष्ट निर्णय घेण्यात आलेला नाही.

यावर प्रतिक्रिया देताना सत्यजीत तांबे म्हणाले, “शासनाने थकीत मालमत्ता कराच्या शास्ती माफीत जसा निर्णय घेतला, तसाच निर्णय अनधिकृत बांधकामांवरील शास्ती माफीसाठी घ्यावा. तसेच, बांधकामे नियमित करण्यासाठी तातडीची योजना जाहीर करावी, जेणेकरून सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल.”

दरम्यान आमदार सत्यजीत तांबे यांनी या मागणीचा पाठपुरावा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 593
शास्ती कर शास्ती दंड सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर : खरीप हंगामातील पिकांची वाढती गरज आणि पिण्याच्या…

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.