Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निळवंडे आवर्तनात वीज पुरवठा सुरळीत ठेवा; आमदार खताळ यांचे महावितरणला निर्देश
बैठक

निळवंडे आवर्तनात वीज पुरवठा सुरळीत ठेवा; आमदार खताळ यांचे महावितरणला निर्देश

महावितरण इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देणार...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/04/2025Updated:18/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर 

जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून २० एप्रिलपासून पाणी सोडले जाणार आहे. तालुक्यातील पाणीटंचाई लक्षात घेता, निळवंडे कालव्याच्या आवर्तनाच्या काळात वीज पुरवठा खंडित होऊ नये, असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिले.

पाणीटंचाई आढावा बैठकीत शेतकऱ्यांनी वीज पुरवठ्याबाबत अनेक तक्रारी आमदार खताळ यांच्याकडे मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महावितरण कार्यालयात आमदार खताळ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीस अधीक्षक अभियंता रमेश पवार, कार्यकारी अभियंता अनिल थोरात, उपअभियंता धनंजय खैरनार, प्रेमकुमार पाटील, सुनील अहिरे यांच्यासह तालुक्यातील वीज उपकेंद्रांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, निळवंडे धरणातून तीन ते चार दिवसात डाव्या व उजव्या कालव्यांना उन्हाळी आवर्तन सुरू होत आहे. या काळात शेतकऱ्यांचा वीज पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होऊ नये, याची दक्षता सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी. तसेच, ग्रामीण भागातील अनेक रोहित्रांवर अतिरिक्त भार येत असल्याने ते नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे ज्या रोहित्रांवर अतिरिक्त भार आहे, तो कमी करण्यासाठी काय उपाययोजना करणार आहात, याचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करा, असे निर्देश त्यांनी दिले.

महावितरण कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांना अधिकारी व कर्मचारी उद्धट वागणूक देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे कार्यालयात तक्रार घेऊन येणाऱ्या प्रत्येक नागरिकाशी सौजन्याने बोला आणि त्यांची अडचण समजून घ्या, असे आवाहनही आमदार खताळ यांनी केले.

महावितरण इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देणार…

कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांचे कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी दोन्ही कार्यालये एकाच छताखाली असावीत. यासाठी महावितरणच्या जागेत नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव तातडीने वरिष्ठ कार्यालयाला पाठवा. यासाठी आपण स्वतः शासन दरबारी पाठपुरावा करू, असे आश्वासन आमदार खताळ यांनी दिले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 809
अमोल खताळ आढावा बैठक निळवंडे धरण महावितरण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात वेगवेगळ्या मुद्यांवरून श्रेय लाटण्याचे प्रकार सुरू असताना, जिल्ह्यात आता निळवंडेच्या…

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.