Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पाण्याच्या टँकरचा टायर फुटून दरीत कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, एक गंभीर जखमी; संगमनेर तालुक्यातील घटना
अपघात

पाण्याच्या टँकरचा टायर फुटून दरीत कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, एक गंभीर जखमी; संगमनेर तालुक्यातील घटना

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही वाड्या-वस्त्यांवर जाणारे रस्ते अत्यंत खराब असल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यातच उन्हाळ्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर

संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील बेलसोंडा वाडीजवळ पाण्याच्या टँकरचा टायर फुटल्याने तो सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत तुकाराम गोविंद घुले (वय ५०) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले सिताराम गणपत घुले हे गंभीर जखमी झाले आहेत. ही हृदयद्रावक घटना आज (मंगळवार, २२ एप्रिल) घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम घुले आणि सिताराम घुले हे दोघेही बेलसोंडा फाट्यावरून बेलसोंडा वस्तीकडे ट्रॅक्टरद्वारे पाणी घेऊन जात होते. दरम्यान, अचानक ट्रॅक्टरचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टर थेट २०० फूट खोल दरीत कोसळला.

ट्रॅक्टर दरीत कोसळल्याचा मोठा आवाज ऐकून वस्तीतील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. खोल दरीत कोसळलेल्या ट्रॅक्टरमधील तुकाराम घुले यांचा मृतदेह ग्रामस्थांनी झोळीच्या साहाय्याने बाहेर काढला. तर गंभीर जखमी झालेल्या सिताराम घुले यांना तातडीने संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी तत्काळ बेलसोंडा वस्ती गाठून घटनेचा पंचनामा केला. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

या घटनेच्या निमित्ताने पठार भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही वाड्या-वस्त्यांवर जाणारे रस्ते अत्यंत खराब असल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यातच उन्हाळ्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ‘पाणी हेच जीवन’ असले तरी पाण्याच्या शोधात एका शेतकऱ्याचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

गावातील डॉ. जवरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जालिंदर घुले, माजी सरपंच बाबाजी घुले, राजेंद्र घुले, राहुल घुले, गावचे उपसरपंच नामदेव घुले आणि ग्रामसेवक प्रमोद जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत कार्यात सहभाग घेतला. तुकाराम गोविंद घुले यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण परिसरात शोक आणि दुःख पसरले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,869
अपघात मृत्यू सावरगाव घुले
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

माजी खासदारावर गुन्हा दाखल

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.