Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

25/08/2026

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पुणे-नाशिक महामार्गावर घारगावनजीक वाहतुकीचा प्रचंड बोजवारा! रखडलेल्या कामामुळे वाहनचालक हैराण; रास्ता रोकोचा इशारा!
पत्रकारिता

पुणे-नाशिक महामार्गावर घारगावनजीक वाहतुकीचा प्रचंड बोजवारा! रखडलेल्या कामामुळे वाहनचालक हैराण; रास्ता रोकोचा इशारा!

या गोंधळावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन आणि वाहतूक पोलीसही कुठे दिसत नसल्याने वाहनचालक मिळेल त्या जागेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यामुळे कोंडी अधिकच वाढत चालली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

घारगाव (संगमनेर)

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात आज गुरुवारी सकाळपासून वाहतूक कोंडीने अक्षरश: थैमान घातले. सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेली वाहतूक कोंडी दुपारी उशिरापर्यंतही निवळली नव्हती, यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. रखडलेले सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम तातडीने सुरू करावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे रस्ता रोको आंदोलन केले जाईल, असा संतप्त इशारा वाहनधारकांसह ग्रामस्थांनी दिला आहे.

परिसरात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामामुळे या महामार्गावर वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. सकाळपासूनच प्रचंड उष्णता जाणवत असताना, रखरखत्या रस्त्यावर तासनतास उभे राहणे वाहनचालकांसाठी असह्य ठरत आहे. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा झाडे नसल्याने प्रवाशांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. या गंभीर परिस्थितीकडे टोल प्रशासनाकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे.

विशेष म्हणजे, या महामार्गाचे यापूर्वीच चौपदरीकरण करण्यात आले आहे आणि आता पुन्हा सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. असे असतानाही, या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांकडून नियमितपणे टोलवसुली केली जात आहे. काही मिनिटांच्या प्रवासासाठी टोल भरूनही अनेक तास लागल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. टोल प्रशासनाकडून या संदर्भात तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

आंबी खालसा फाटा, घारगाव आणि चंदनापुरी घाट या दरम्यान महामार्गावर दररोज वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली आहे. आज गुरुवारी सकाळपासून घारगाव परिसरात तब्बल काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

मुळा नदीवरील पुलावर पुणे लेनवर सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक नाशिक लेनने वळविण्यात आली आहे. एकेरी वाहतूक आणि अवजड वाहनांच्या सततच्या ये-जा मुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. वाहतुकीचे योग्य नियोजन नसल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. या गोंधळावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन आणि वाहतूक पोलीसही कुठे दिसत नसल्याने वाहनचालक मिळेल त्या जागेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यामुळे कोंडी अधिकच वाढत चालली आहे.

या गंभीर परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या वाहनधारकांनी आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला तातडीने कामाला सुरुवात करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. जर लवकरच यावर तोडगा काढला नाही, तर तीव्र स्वरूपाचे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे, ज्याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असेही आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान या मार्गावर सुरू असलेल्या कामामुळे आतापर्यंत पर्यायी वाहतुकीची कोणतीही व्यवस्था संबंधितांकडून केली जात नसल्याने झालेल्या अपघातामध्ये अनेक बळी गेले आहे तर कित्येक जण जायबंदी झाले आहे, मात्र याकडे प्रशासन आणि संबंधितांचे सोयीस्कर दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे महामार्गाचे चौपदरीकरण होऊन देखील मृत्युघंटा म्हणून या मार्गाची ओळख कायम राहिले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,150
नाशिक पुणे महामार्ग वाहतूक कोंडी सिमेंट काँक्रीटचे रेंगाळलेले काम
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
व्याख्यान

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

By Annant Ppangarkar25/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: कर्म म्हणजे केवळ जगण्याची धावपळ किंवा जबाबदारीची पूर्तता…

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.