Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन… गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा जास्तीत जास्त लाभ द्या – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
आरोग्य

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन… गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा जास्तीत जास्त लाभ द्या – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

संलग्न रुग्णालयांची यादी व पात्रता निकषांसाठी cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, दि. १ – मुख्यमंत्री सचिवालयाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत केंद्राचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आज उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांना लाभ देण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा व उपचारांची व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी, अशा सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागराज चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूराव नागरगोजे, जिल्हा कक्ष अधिकारी तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. नीळकंठ ठाकरे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, “शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, आयुष्यमान कार्ड, धर्मादाय रुग्णालय योजनांचा लाभ न मिळालेल्या गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून प्राधान्याने लाभ देण्यात यावा. या योजनेची माहिती जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये भित्तिपत्रकांच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात यावी.”
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेल्या रुग्णांना संबंधित योजनेच्या जिल्हा समन्वयकांद्वारे संलग्नित (Empanelled) रुग्णालयात दाखल करण्याबाबत कळविण्यात येणार आहे. धर्मादाय रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या बाबतीत, जिल्हा धर्मादाय उपायुक्त कार्यालयातून जिल्ह्यातील उपलब्ध धर्मादाय संस्थांची माहिती घेऊन त्यानुसार रुग्णास रुग्णालयात दाखल करण्याबाबत व सवलतीच्या दराने अथवा मोफत उपचार उपलब्ध करून देण्याकरिता लेखी स्वरूपात कळविण्यात येणार आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत, ० ते १८ वर्षे वयापर्यंतच्या रुग्णांकरिता योजनेतील विहित व्याधी, विकार अनुरूप मोफत उपचार केले जातात. पात्र रुग्णांना जिल्ह्यातील योजनेशी संलग्नित रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात येईल. या योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या अर्थात या योजनांच्या निकषांच्या कक्षेबाहेरील रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे वैद्यकीय उपचारांसाठी अर्थसहाय्य दिले जाते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष अंतर्गत संलग्न रुग्णालयांची यादी व पात्रता निकषांसाठी cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा कक्ष अधिकारी ठाकरे यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 722
जिल्हाधिकारी कार्यालय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष राधाकृष्ण विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

मी पक्ष सोडलेला नाही माझ्या विजयाचं श्रेय कोणीही उकळू नये; स्वीडनच्या खासदार नीला विखेंच्या स्पष्टीकरणाने विखेंचं हसं

25/09/2026

संगमनेर तालुक्यात १०२ कोटींच्या विकासकामांचा धडाका; उद्या पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पुण्यात विविध मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनाला…

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.