Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे दुःखद निधन; अहिल्यानगरमध्ये शोककळा
श्रद्धांजली

माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे दुःखद निधन; अहिल्यानगरमध्ये शोककळा

त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी आज दुपारी २ वाजता त्यांच्या सारसनगर, भवानीनगर येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर, दुपारी ४ वाजता अमरधाम स्मशानभूमी, अहिल्यानगर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/05/2025Updated:02/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर

अहिल्यानगरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील आधारस्तंभ, माजी आमदार अरुणकाका बलभीम जगताप यांचे आज, (२ मे २०२५) निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

अरुणकाका जगताप हे नगर शहर आणि परिसरात त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्यामुळे अत्यंत लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते पुण्यातील एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. डॉक्टरांचे अथक प्रयत्न निष्फळ ठरले आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली.

अरुणकाकांच्या पश्चात पत्नी पार्वती, चिरंजीव आमदार संग्राम जगताप, दुसरे चिरंजीव माजी जि.प. सदस्य सचिन, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले आणि भानुदासजी कोतकर यांचे व्याही होते.

अरुणकाकांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली. त्यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्षपद यशस्वीरित्या भूषविले, यासोबतच ते अहमदनगर पालिकेचे लोकप्रिय नगराध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद आणि गुणे आयुर्वेद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही महत्त्वपूर्ण योगदान दिले. पुढे, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेवर सलग दोन वेळा निवडून गेले आणि त्यांनी आपल्या कामातून एक वेगळी ओळख निर्माण केली.

त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी आज दुपारी २ वाजता त्यांच्या सारसनगर, भवानीनगर येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर, दुपारी ४ वाजता अमरधाम स्मशानभूमी, अहिल्यानगर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली… “माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या दुःखद निधनानं राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेलं, सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष, प्रयोगशील शेतकरी, वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक म्हणून ते कायम अहिल्यानगरवासियांच्या लक्षात राहतील. त्यांचे निधन ही अहिल्यानगर जिल्ह्याची मोठी आणि असून त्यांच्या निधनाचा धक्का पचवण्याची शक्ती त्यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप, संपूर्ण जगताप कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांना मिळो, अशी प्रार्थना करतो. आम्ही सर्वजण जगताप कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. दिवंगत अरुणकाकांच्या आत्म्यास सद्गती लाभो, ही प्रार्थना.,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,620
अरुणकाका जगताप दुखद निधन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

08/10/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पुण्यात विविध मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनाला…

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.