Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका: सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, राज्यात चार महिन्यांत रणधुमाळी!
न्यायालय

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका: सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, राज्यात चार महिन्यांत रणधुमाळी!

सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार असून निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नवी दिल्ली-

राज्यात तब्बल चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज (६ मे २०२५) महत्त्वाचा निर्णय दिला आहे. येत्या चार महिन्यांच्या आत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांमधील महापालिका निवडणुकांचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार असून निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे.

राज्यातील प्रमुख महापालिका, जिल्हा परिषदा आणि नगर पालिकांच्या निवडणुका मागील जवळपास पाच वर्षांपासून विविध कारणांमुळे प्रलंबित होत्या. या दिरंगाईमुळे राज्यात प्रशासकीय राजवट लागू असल्याची टीका अनेक राजकीय पक्षांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे आणि लवकरच निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. कोर्टाने स्पष्टपणे सांगितले आहे की, या निवडणुका २०२२ पूर्वी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या नियमांनुसारच घ्याव्यात. याचा अर्थ, निवडणुकांमध्ये ओबीसींसाठी असलेले आरक्षण सध्याच्या स्थितीत कायम राहील. ओबीसी आरक्षणासंबंधी काही वादग्रस्त मुद्दे मात्र न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी राखून ठेवले आहेत, परंतु निवडणुकांच्या प्रक्रियेला या स्थगितीचा कोणताही अडथळा येणार नाही, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचा मार्ग सुकर झाला आहे, हे निश्चित झाले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,086
आरक्षण निर्णय सर्वोच्च न्यायालय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शिरसगाव धुपे येथील आदिवासी बांधवांनी आमदार अमोल खताळ यांच्या…

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.