Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अवकाळी पावसाने संगमनेरला झोडपले, शेतकरी हवालदिल; माजी मंत्री थोरातांनी केल्या तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना
महाराष्ट्र संवाद विशेष

अवकाळी पावसाने संगमनेरला झोडपले, शेतकरी हवालदिल; माजी मंत्री थोरातांनी केल्या तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना

या गंभीर परिस्थितीची दखल घेत, राज्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/05/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – प्रतिनिधी
मागील दोन-तीन दिवसांपासून संगमनेर तालुक्यात थैमान घालत असलेल्या अवकाळी पावसाने आज अक्षरशः कहर केला. संगमनेर शहर आणि पश्चिम तसेच पूर्व भागाला जोरदार तडाखा बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेला कांदा, भाजीपाला आणि साठवणुकीतील पिके पाण्यात वाहून गेली आहेत. अनेक घरांची पडझड झाली असून काही ठिकाणी जनावरे दगावली आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, राज्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.
आज (सोमवार, १९ मे) निमगाव भोजपूर, निमज, चंदनापुरी, वेल्हाळे, सांगवी, पेमगिरी नांदुरी, राजापूर, चिकणी या परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या भागातील प्रमुख पीक असलेल्या डाळिंबाला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. फळांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याव्यतिरिक्त, शेतकऱ्यांनी शेतात तयार करून साठवलेला कांद्याचा डेपो पूर्णपणे पाण्यात गेला आहे. कोबी, फ्लॉवर आणि वालवड यांसारख्या भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये घरांच्या भिंती कोसळल्याच्या आणि काही ठिकाणी जनावरे दगावल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
तालुक्यात अवकाळी पावसामुळे ओढवलेल्या या संकटानंतर तातडीने हालचाल करत, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्व कार्यकर्त्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्काळ धावण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनाने तातडीने सर्व बाधित क्षेत्रांची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
संगमनेर तालुका हा एक कुटुंब असून या कठीण परिस्थितीत तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. लवकरच आपण स्वतः विविध भागांना भेटी देऊन नुकसानीचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संकटाच्या वेळी सर्वांनी एकजुटीने एकमेकांना मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ आपापल्या भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीकार्य सुरू केले आहे.

डाळिंब, कांद्यासह टोमॅटो व इतर पिकांचे मोठे नुकसान… तालुक्याच्या पश्चिम भागात डाळिंबाचे मोठे उत्पादन घेतले जाते. यासोबतच भाजीपाल्याची लागवडही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, अचानक आलेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. शेतात साठवलेला कांद्याचा डेपो पूर्णपणे खराब झाला असून टोमॅटो आणि इतर भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटात सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी निमगाव भोजापूर येथील प्रगतशील शेतकरी सुनील कडलग आणि निमजचे उपसरपंच अरुण गुंजाळ यांनी केली आहे.
संगमनेर शहरातही तुंबली गटार… एकीकडे अवकाळी पावसाने ग्रामीण भागाला त्रस्त केले असताना, संगमनेर शहरातही नगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका नागरिकांना बसला. नवीन नगर रोड परिसरात पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामुळे रस्ते जलमय झाले आणि नागरिकांना ये-जा करणेही कठीण झाले. दुचाकी आणि इतर वाहने पाण्यातून काढताना नागरिकांचे मोठे हाल झाले. या सर्व परिस्थितीला नगरपालिका प्रशासनाची उदासीनता जबाबदार असल्याची कठोर टीका माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांनी केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,351
अवकाळी पाऊस नुकसान पंचनामे बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.