Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिक्षण आणि समाजसेवेचा अनोखा संगम, शिक्षिका वृषाली कडलग यांना ‘मानव सेवा’ चा राज्यस्तरीय सन्मान!
यश / निवड / पुरस्कार

शिक्षण आणि समाजसेवेचा अनोखा संगम, शिक्षिका वृषाली कडलग यांना ‘मानव सेवा’ चा राज्यस्तरीय सन्मान!

या सोहळ्यात, मानव सेवा जीवन गौरव पुरस्कार विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे सहकार्याध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांना त्यांच्या सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल तर संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील देशमुख मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका वृषाली सुनील कडलग यांना 'मानव सेवा राज्यस्तरीय पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/05/2025Updated:20/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – प्रतिनिधी 

मंदिरांबरोबरच शिक्षण मंदिरे समृद्ध झाली आणि वृषाली कडलग यांच्यासारख्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची पिढी घडवली, तर निश्चितच एका सामर्थ्यसंपन्न समाजाची निर्मिती होईल. समाजासाठी समर्पित वृत्तीने कार्य करणाऱ्या व्यक्ती नेहमीच इतरांसाठी प्रेरणास्रोत ठरतात, असे गौरवोद्गार ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले.

लातूर येथे मानव विकास संस्थेतर्फे आयोजित ‘मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार २०२५’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर रमाकांत व्यासजी, आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, सुप्रसिद्ध गायक डॉ.अंबरीष महाराज देगलूरकर यांचीही उपस्थिती होती.

या सोहळ्यात, मानव सेवा जीवन गौरव पुरस्कार विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे सहकार्याध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांना त्यांच्या सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल तर संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील देशमुख मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका वृषाली सुनील कडलग यांना ‘मानव सेवा राज्यस्तरीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांना हा पुरस्कार शैक्षणिक, सामाजिक आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल देण्यात आला.

वृषाली कडलग यांनी शिक्षिका म्हणून शाळेच्या भौतिक आणि शैक्षणिक विकासासाठी लोकसहभागातून केलेल्या कार्याची दखल या पुरस्कारासाठी घेण्यात आली. यापूर्वीही त्यांना ‘द इन्स्पायरिंग वुमन अवॉर्ड २०२२’, ‘जिल्हा शिक्षक पुरस्कार २०२१’, ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२३’ आणि ‘एपीजे अब्दुल कलाम अवॉर्ड २०२३’ (नवी दिल्ली) यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या योगदानातून देशमुख मळा शाळेला ‘स्वच्छ सुंदर माझी शाळा’ उपक्रमांतर्गत तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळाला आहे.

जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी मराठा वधू वर सूचक मेळावे, वयात येणाऱ्या मुलींसाठी ‘कळी उमलताना’ प्रकल्प आणि महिलांसाठी कॅन्सर विषयक मार्गदर्शन यांसारखे सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. यासोबतच, संगमनेर इनरव्हील क्लबच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील २१ शाळांमध्ये ‘हॅप्पी स्कूल’ प्रकल्प चालवून त्या शाळांना डिजिटल क्लासरूम, खेळणी आणि हँड वॉश स्टेशन उपलब्ध करून देत सक्षम बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

कडलग यांच्या या कार्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन मानव विकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सरोजा घोगरे, सचिव वसंत घोगरे यांनी केले होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 4,186
वृषाली कडलग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

प्रवीण बागडे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

18/08/2026

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

18/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

By Annant Ppangarkar04/10/20260

बाळासाहेब घोडके- शिवसेना हे चार अक्षरी नाव उच्चारताच मनात एक झंझावात उभा राहतो. वंदनीय बाळासाहेब…

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.