Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; मालमत्ता करावरील शास्ती माफ! पालिकेला जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार प्रस्ताव
राजकारण

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; मालमत्ता करावरील शास्ती माफ! पालिकेला जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार प्रस्ताव

या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल खताळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 20, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – प्रतिनिधी 

नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील थकलेल्या मालमत्ता करावरील शास्तीमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने ‘अभय योजना’ लागू केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अनेक वर्षांपासून नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील नागरिक थकीत मालमत्ता करावरील शास्तीच्या ओझ्याखाली दबले होते. आमदार खताळ यांनी नागरिकांची ही समस्या शासनाकडे प्रभावीपणे मांडली. त्यांनी वेळोवेळी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे निवेदने सादर करून यावर तोडगा काढण्याची मागणी केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शास्ती माफीसाठी ‘अभय योजना’ मंजूर करण्यात आली आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम १५० अ (१) मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींनी शास्ती माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करायचे आहेत. जिल्हाधिकारी ५०% पर्यंतच्या माफीवर ३० दिवसांच्या आत निर्णय घेतील आणि त्यांचा निर्णय अंतिम असेल. ५०% पेक्षा जास्त माफीच्या प्रस्तावांना शासनाची मंजुरी घ्यावी लागणार आहे. या योजनेमुळे नगरपरिषदांच्या कर वसुलीत वाढ होईल आणि नागरिकांनाही आर्थिक दिलासा मिळेल. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल खताळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत.

४० वर्षांतील प्रलंबित प्रश्न १०० दिवसांत मार्गी!… संगमनेर नगरपालिकेवर मागील ४० वर्षांपासून एकाच घराण्याची सत्ता होती. त्यांच्या काळात नागरिकांवर अन्यायकारक शास्ती कर लादला गेला, परंतु तो माफ करण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न झाले नाहीत. मात्र, विद्यमान सरकार सत्तेत आल्यानंतर केवळ १०० दिवसांतच मालमत्ता करावरील शास्ती माफीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असल्याचे आमदार खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

संगमनेर शहरातील नागरिकांवर अनेक वर्षांपासून अन्यायकारक शास्ती आकारली जात होती. यामुळे नागरिकांवर मोठा आर्थिक भार येत होता. ही बाब लक्षात घेऊन आम्ही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. आमदार झाल्यानंतर मी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून हा कर माफ करण्याची विनंती केली होती. आज शासनाने हा निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. शासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे लाखो कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे. नागरिकांनी या अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. – अमोल खताळ, आमदार.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,089
अभय योजना अमोल खताळ शास्ती कर शास्ती दंड
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026

‘दुर्गाताई, आता आत्मपरीक्षणाची गरज; लाभार्थ्यांना बाजूला करा!, ताईंवर चिखलफेक होत असताना काँग्रेसचे २८ नगरसेवक गप्प का? – शिवसेनेचे अमर कतारी यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

By अनंत पांगारकरJuly 15, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खांडगाव शिवारात एका १५ वर्षीय…

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.