Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चंदनापुरी घाटातील रस्ते कामामुळे वाढते अपघात; युवक काँग्रेसचा रास्ता रोकोचा इशारा! डॉ. जयश्री थोरात यांनी केली वाढत्या अपघातांवर चिंता व्यक्त
आंदोलन

चंदनापुरी घाटातील रस्ते कामामुळे वाढते अपघात; युवक काँग्रेसचा रास्ता रोकोचा इशारा! डॉ. जयश्री थोरात यांनी केली वाढत्या अपघातांवर चिंता व्यक्त

जर यावर त्वरित मार्ग काढला नाही, तर शुक्रवारी, (२३ मे) सकाळी ९:३० वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – प्रतिनिधी

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे अपघातांचे प्रमाण लक्षणीय वाढले असून, यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करत युवक काँग्रेसने प्रशासनाला निवेदन दिले असून, २३ मे रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. युवक काँग्रेसच्या अध्यक्षा, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी या मार्गावरील वाढत्या अपघातांवर चिंता व्यक्त केली आहे.

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून त्यांच्या कार्यकाळात नाशिक-पुणे महामार्गाचे चौपदरीकरण यापूर्वीच पूर्ण झाले होते. आता नव्याने सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे, यामुळे चंदनापुरी घाटात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका युवक काँग्रेस आणि चंदनापुरी ग्रामस्थांनी प्रांताधिकारी व पोलीस प्रशासनाला या कामाची तातडीने पूर्तता करण्यासाठी निवेदन दिले आहे.

यावेळी सरपंच भाऊराव राहणे, कारखान्याचे संचालक विजय राहणे, अंकुश ताजने, भाऊसाहेब सातपुते, रमेश गफले, विजय पवार, प्रथमेश बालोडे, शरद पावबाके, दीपक पाळंदे, अर्जुन घोडे, दीपक शिंदे, समीर शिंदे, तुषार काकड, किरण खुळे, वैष्णव मुर्तडक, शहाबाद शेख, तुषार गवांदे, रोशन गोफने, विशाल वैराळ, ईश्वर फापाळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, चंदनापुरी घाटातील काँक्रिटीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीची मोठी गैरसोय होत असून, विशेषतः तीव्र उतारांमुळे मागील काही महिन्यांत येथे अनेक गंभीर अपघात झाले आहेत, यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी टोल प्रशासनाला वारंवार विनंती करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

बाळासाहेब थोरात यांनी तालुक्याच्या विकासासाठी दहा वर्षांपूर्वीच नाशिक-पुणे महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण केले होते. मात्र, आता सुरू असलेले काँक्रिटीकरण काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. कामातील या दिरंगाईमुळे संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर, युवक काँग्रेसने प्रशासनासोबत तातडीने चर्चा घडवून आणण्याची मागणी केली आहे. जर यावर त्वरित मार्ग काढला नाही, तर शुक्रवारी, (२३ मे) सकाळी ९:३० वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चंदनापुरी ग्रामस्थ व युवक काँग्रेसने दिला असून या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासन व तालुका प्रशासनाची राहील. – भाऊराव रहाणे, सरपंच.

अपघातांचे वाढते प्रमाण दुर्दैवी… पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. यावरील काँक्रिटीकरणामुळे एकेरी वाहतूक सुरू असल्याने सर्वांची गैरसोय होत आहे. तीव्र उतार आणि जास्त वाहतूक यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, अनेक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. टोल प्रशासन आणि तालुका प्रशासनाने यावर तातडीने बैठक बोलावून मार्ग काढावा. – डॉ. जयश्री थोरात.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,397
आंदोलन निवेदन रास्ता रोको
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पुण्यात विविध मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनाला…

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.