Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये वीजपुरवठ्याच्या समस्येने नागरिक हैराण; संभाजी ब्रिगेडची नुकसान भरपाईची मागणी
सामाजिक

संगमनेरमध्ये वीजपुरवठ्याच्या समस्येने नागरिक हैराण; संभाजी ब्रिगेडची नुकसान भरपाईची मागणी

कायद्यानुसार नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. या संदर्भात संभाजी ब्रिगेडने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी

संगमनेर शहर आणि तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा, वारंवार होणारे व्होल्टेजचे चढ-उतार आणि विजेचे झटके यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या प्रकारांमुळे त्रस्त झालेल्या संगमनेरच्या संभाजी ब्रिगेडने तात्काळ वीजपुरवठ्यात सुधारणा करण्याची आणि कायद्यानुसार नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. या संदर्भात संभाजी ब्रिगेडने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही संगमनेर येथील सर्व नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून हे निवेदन सादर करत आहोत. गेल्या काही महिन्यांपासून वीज पुरवठ्यात वारंवार येणाऱ्या अडचणींमुळे, विशेषतः फेज जाणे, कमी किंवा जास्त व्होल्टेज यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, वृद्धांचे आरोग्य, व्यापाऱ्यांचे व्यवहार आणि सर्वसामान्यांचे जीवनमान यावर तीव्र परिणाम झाला आहे.

विजेअभावी पंखे आणि दिवे बंद राहत असल्याने उष्णतेमुळे नागरिक हैराण आहेत. पंप न चालल्यामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे, तर फ्रीज, टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल चार्जर यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणे अशक्य झाले असून, अनेक उपकरणांचे नुकसान झाले आहे. नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला असून, व्यापाऱ्यांचे आणि ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे, कारण अनेक व्यवसाय विजेवर अवलंबून आहेत. लहान मुले आणि वृद्धांना विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे त्रास सहन करावा लागतो.

संभाजी ब्रिगेडने वीज कायदा 2003 (Electricity Act, 2003) आणि MERC (Maharashtra Electricity Regulatory Commission) च्या “Standards of Performance” नियमावलीचा हवाला देत नुकसान भरपाईची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केले आहे की, वीज कायदा 2003 मधील कलम 57 (1) व 57(2) नुसार, सेवा कार्यक्षमतेची अट पाळली नाही तर ग्राहकास भरपाई देणे बंधनकारक आहे, तसेच कलम 59 मध्ये विलंब किंवा दुर्लक्ष केल्यास आर्थिक भरपाई देण्याची तरतूद आहे. याशिवाय, MERC च्या नियमावलीनुसार, कमी व्होल्टेज किंवा फेज गेलेली समस्या 4-12 तासात सोडवणे आवश्यक आहे आणि जर वेळेत सेवा न दिल्यास ग्राहकास दररोज 50-100 रुपये भरपाईची तरतूद आहे.

या सर्व बाबींचा विचार करता, संभाजी ब्रिगेडने वीज वितरण कंपनीकडे तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याची, नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर लेखी उत्तर देण्याची, MERC च्या नियमानुसार सर्व पात्र ग्राहकांना नुकसान भरपाई देण्याची आणि पुढील काळात ही समस्या पुन्हा उद्भवणार नाही याची लेखी हमी देण्याची मागणी केली आहे. निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष राम अरगडे यांच्यासह आदित्य रुपवते, विशाल वैराळ, विकी पवार, ओम टोरपे, यश गायकवाड, नवनाथ सदगीर, साजीद बेग, ओम वाघमारे आदींच्या सह्या व नावे आहेत. या मागण्या वेळेत पूर्ण न झाल्यास नागरिकांतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 579
निवेदन नुकसान भरपाई वीज वितरण कंपनी संभाजी ब्रिगेड
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीमुळे देशात आदर्श मॉडेल ठरलेल्या…

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.