Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरातील सिग्नल १५ जूनपर्यंत सुरू होणार: एसपी सोमनाथ घार्गे यांची ग्वाही
सामाजिक

संगमनेरातील सिग्नल १५ जूनपर्यंत सुरू होणार: एसपी सोमनाथ घार्गे यांची ग्वाही

मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी बसवलेले ट्रॅफिक लाईट्स पुन्हा कधीच उपयोगात आले नाहीत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/05/2025Updated:25/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – 

अहिल्यानगर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी संगमनेर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. येत्या १५ जूनपर्यंत शहरातील सिग्नल पूर्ववत सुरू होतील, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, बंद पडलेली वाहतूक शाखा पुन्हा सुरू करण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही ते म्हणाले.

शनिवारी (२४ मे रोजी) अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील तिसवाड सेक्टर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र, जवान संदीप पांडुरंग गायकर (वय ३२) यांच्यावर आज त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारासाठी ते उपस्थित होते. या निमित्ताने घार्गे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्याला भेट दिली.

यावेळी त्यांच्यासोबत श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे आणि संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे उपस्थित होते.

वाहतूक शाखेचे पुनरुज्जीवन आणि सिग्नल यंत्रणा… संगमनेरमध्ये यापूर्वी स्वतंत्र वाहतूक शाखा कार्यरत होती, मात्र ती बंद झाल्याने शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. यावर बोलताना एसपी घार्गे म्हणाले की, वाहतूक शाखा बंद करण्यामागची कारणे पडताळून पाहिली जातील आणि या समस्येचे निराकरण नक्कीच केले जाईल.

मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी बसवलेले ट्रॅफिक लाईट्स पुन्हा कधीच उपयोगात आले नाहीत. यावर एसपी घार्गे यांनी पोलीस निरीक्षक देशमुख यांना सूचना केली की, मुख्याधिकारी कोकरे यांच्यासोबत तातडीने सर्वेक्षण करून ट्रॅफिक लाईट्स पुन्हा सुरू करण्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात.

कमी मनुष्यबळात वाहतूक नियमन… ट्रॅफिक सिग्नल सुरू झाल्यामुळे कमी पोलीस मनुष्यबळात वाहतुकीचे नियमन करणे शक्य होईल, असे मत एसपी घार्गे यांनी व्यक्त केले. सुरुवातीच्या टप्प्यात शहरातील दोन ते तीन मुख्य चौकांत ट्रॅफिक सिग्नल सुरू केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. यामुळे संगमनेरकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 992
एसपी वाहतूक कोंडी सिग्नल सोमनाथ घार्गे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या युनियन अध्यापक विद्यालयातून सन १९८४ ते १९८६ च्या वर्गातून बाहेर…

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.