Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर शहर पोलिसांच्या कारवाईत गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक
गुन्हेगारी

संगमनेर शहर पोलिसांच्या कारवाईत गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक

संगमनेर शहर पोलिसांनी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/05/2025Updated:30/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – प्रतिनिधी

संगमनेर शहर पोलिसांनी धाडसी कारवाई करत दोन आरोपींना गावठी पिस्तूल आणि मोबाईलसह अटक केली. ही कारवाई महात्मा फुले शाळेजवळून घुलेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली. आरोपींकडून एकूण ६१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, यात ५०,००० रुपये किमतीचे गावठी पिस्तूल, १०,००० रुपये किमतीचा वन प्लस नोड सी ई २ मोबाईल, आणि १,००० रुपयांचा एक बंद पडलेला मोबाईल फोन यांचा समावेश आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शेख मुजम्मील शेख मजिद (वय २२, रा. वाणी मुस्लमान बौध्द वाडा, जमुना, ता. खामगाव, जि. बुलढाणा) आणि जमीरखान नजीरखान (वय ४०, रा. मिलन कॉलनी, ता. खामगाव, जि. बुलढाणा) अशी आहेत. संगमनेर शहर पोलिसांनी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुरुवारी (२९ मे) रात्री १ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी महात्मा फुले शाळा ते घुलेवाडीकडे जाणाऱ्या रोडवर सापळा रचला. यावेळी अंधारात संशयास्पद स्थितीत फिरताना दिसलेल्या दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे गावठी पिस्तूल आणि मोबाईल आढळून आले. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार रामकिशन मुकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.नं. ४९१/२०२५, शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३/२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे, रामकिशन मुकरे, अतुल दिनकर उंडे, अजित बाळू कुन्हे, संतोष सोपान बाचकर आणि साईनाथ रामदास पवार यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,246
कारवाई गावठी पिस्तूल
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- तणावग्रस्त जीवनशैलीच्या काळात लोकांना हसवणे हे सर्वात मोठे पुण्याचे…

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.