Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महेश नवमी उत्सव: केरळी बँड आणि महिलांच्या टाळ नृत्याने संगमनेरकरांचे लक्ष वेधले!
धार्मिक

महेश नवमी उत्सव: केरळी बँड आणि महिलांच्या टाळ नृत्याने संगमनेरकरांचे लक्ष वेधले!

समारोपाप्रसंगी अल्पोपहार सेवा श्रीनिवास व राजेंद्र सोमाणी (राजेंद्र उद्योग समूह) यांनी दिली, तर रसपान सेवा युवा महेशने पुरवली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी

संगमनेर तालुका माहेश्‍वरी सभेच्या वतीने आयोजित महेश नवमीनिमित्त बुधवारी (४ जून) निघालेल्या भव्य शोभायात्रेने संगमनेरकरांचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः केरळी बँड आणि माहेश्‍वरी महिलांच्या टाळ नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय माहेश्‍वरी समाज बंधू-भगिनींची आकर्षक वेशभूषा आणि शोभायात्रेतील नियोजनबद्धता हे देखील प्रमुख आकर्षण ठरले. आमदार अमोल खताळ यांनीही या शोभायात्रेत सहभागी होत माहेश्‍वरी बंधू-भगिनींना महेश नवमीच्या शुभेच्छा दिल्या.

महेश नवमीनिमित्त श्री बालाजी मंदिरात महेश भगवान रुद्राभिषेक यजमान पल्लवी व शैलेश कासट आणि शिवानी व कृष्णा आसावा यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर लगेचच शोभायात्रेचा शानदार शुभारंभ झाला. या शोभायात्रेचे नियोजन आणि रथ सजावट राजस्थान युवक मंडळाच्या सदस्यांनी अतिशय सुंदरपणे केली होती.

शोभायात्रेत महेश भगवान रथ, अश्वारूढ बालके, उमा-महेशच्या वेशातील बालचमू, महेश वंदनेसह भक्तीगीतांवर सुंदर टाळनृत्य सादर करणाऱ्या माहेश्‍वरी महिला मंडळाच्या सदस्या, बँड पथक, केरळी बँड आणि डीजे साऊंड सिस्टिम यांचा समावेश होता. संग्राम पतसंस्था, भारतीय जनता पार्टी कार्यकारी समिती आणि क्षत्रिय समाजाच्या वतीने शोभायात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

शोभायात्रेदरम्यान मालपाणी उद्योग समूहाकडून पेयजल व लस्सीचे, महेश पतसंस्थेच्या वतीने पेढ्यांचे, तर अट्टल परिवाराकडून ज्युसचे वाटप करण्यात आले. नवीन नगर रोडवर फटाक्यांची मनमोहक आतषबाजी करण्यात आली. समारोपाप्रसंगी अल्पोपहार सेवा श्रीनिवास व राजेंद्र सोमाणी (राजेंद्र उद्योग समूह) यांनी दिली, तर रसपान सेवा युवा महेशने पुरवली.

या शोभायात्रेत अबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. शोभायात्रेच्या यशस्वितेसाठी प्रदेश सभा सदस्य सतीशकुमार बाहेती, संगमनेर तालुका सभेचे अध्यक्ष श्रीनिवास भंडारी, सचिव जुगलकिशोर बाहेती, उपाध्यक्ष संजय रा. मालपाणी, कोषाध्यक्ष सुजितकुमार खटोड, संघटन मंत्री सचिन मणियार, सह-सचिव जयप्रकाश भुतडा, माहेश्‍वरी पंच ट्रस्टचे अध्यक्ष गिरीश मालपाणी, सरपंच विश्‍वनाथ कलंत्री, उत्सव समिती प्रमुख अतुल झंवर, महेश नवमी उत्सवाचे प्रकल्प प्रमुख सुमित अट्टल, वेणुगोपाल कलंत्री, सिद्धांत झंवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,129
महेश नवमी मिरवणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

आश्वी पोलिसांच्या दडपशाहीने विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न; गणेश मंडळांचा संताप, चौकशीची मागणी

26/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

By Annant Ppangarkar04/10/20260

बाळासाहेब घोडके- शिवसेना हे चार अक्षरी नाव उच्चारताच मनात एक झंझावात उभा राहतो. वंदनीय बाळासाहेब…

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.