Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

धर्माची ग्लानी सर्वप्रथम माणसाच्या अंतःकरणात होते : डॉ. संजय मालपाणी; संगमनेरमध्ये नृत्यवंदनेने ‘मनशांती व जीवनविकास व्याख्यानमाले’चा समारोप

26/08/2026

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांना लुटणारी टोळी जेरबंद; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन गुन्ह्यांचा उलगडा

26/08/2026

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेला मिळाले हे आंतरराष्ट्रीय मानांकन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कॉर्पोरेट ट्रेनिंग हॉलचे उद्घाटन

26/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये गोवंश हत्यासत्र सुरूच; पोलीस, पालिका प्रशासनाबरोबरच ‘हिंदुत्ववादी’ आणि ‘मुस्लिम’ नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
पत्रकारिता

संगमनेरमध्ये गोवंश हत्यासत्र सुरूच; पोलीस, पालिका प्रशासनाबरोबरच ‘हिंदुत्ववादी’ आणि ‘मुस्लिम’ नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

संगमनेरातील गोवंश हत्याकांडाच्या वाढत्या घटनांनी स्थानिक पोलीस, अहिल्यानगर एलसीबी, नगरपालिका प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/06/2025Updated:10/06/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी

संगमनेर शहरात गोवंश हत्या सातत्याने सुरू असून, वेळोवेळी हे प्रकार उघडकीस येत असतानाही यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने सलग दोन दिवस बेकायदेशीर कत्तलखान्यांवर टाकलेल्या छाप्यात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पोलिसांनी १७ गुन्हे दाखल करत ७३ गोवंश जनावरांना कत्तलीपासून वाचवल्याचे सांगितले. कसायांवर केवळ कागदोपत्री गुन्हे दाखल होत असल्याने व ठोस कारवाई होत नसल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरत आली आहे.

या गंभीर विषयावर यापूर्वी आक्रमक भूमिका घेणारे हिंदुत्ववादी नेते आणि संघटना तसेच सुरुवातीला कत्तलखान्यांविरोधात संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी थेट भूमिका घेतल्यानंतर काही कसायांचे वाडे पाडण्यात आले मात्र, त्यानंतर देखील हा व्यवसाय पूर्ववत सुरू असल्याने संगमनेरचे लोकप्रतिनिधी आता पूर्णपणे गप्प आहेत. त्यांच्याकडून याप्रश्नी संगमनेरकरांना मोठ्या अपेक्षा आहे. दुसरीकडे, भाजपमध्ये जाऊन तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर टीका करणारे मुस्लिम नेतेही आता अवैध कत्तलखाने आणि गोवंश हत्या थांबवण्यासाठी भाजप व बजरंग दलाचा अजेंडा राबवणार आहेत की केवळ ‘बोलघेवडेपणा’ करणार, असा प्रश्न नागरिक समाज माध्यमातून उपस्थित करत आहेत. ही दुहेरी भूमिका जनसामान्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण करत आहे.

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह आणि आरोपींना अभय?… संगमनेर परिसरात गोवंश हत्यांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कत्तलखाने असून, पोलिसांकडून अनेकदा कारवाई होऊनही हे प्रकार थांबताना दिसत नाहीत. आतापर्यंत या संदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या काही शेकड्याच्या पटीत आहे. मात्र, पोलीस प्रशासनाच्या कारवाया सातत्याने संशयाच्या घेऱ्यात आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी फरार दाखवले जातात, तर वारंवार तेच-तेच आरोपी निष्पन्न होऊनही त्यांच्यावर कठोर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे गोवंश हत्या करणारे सर्रासपणे आपला व्यवसाय करत असून, त्यांना कायद्याची कोणतीही भीती नसल्याचे चित्र आहे.

यापूर्वी गोवंश हत्याकांडाचे प्रकार उघडकीस येत तेव्हा हिंदुत्ववादी संघटना आणि त्यांचे नेते रस्त्यावर उतरून आंदोलन करत असत, तीव्र निदर्शने करत असत. तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक यांच्या ‘हप्तेखोरी’ विरोधात जाहीरपणे प्रशासकीय भवनासमोर मोठे जन आंदोलन देखील छेडण्यात आले होते. या आंदोलनातून अनेक गोष्टी उघड झाल्यानंतरही पुढे काय झाले, हा प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरित आहे. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करून तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर अवैध कत्तलखाने आणि गोवंश हत्यांच्या मुद्द्यावरून जोरदार टीका करणारे काही मुस्लिम नेतेही आता सत्तेत सहभागी असूनही या विषयावर मौन बाळगून आहेत. यामुळे त्यांची राजकीय भूमिका केवळ फायद्यासाठी होती का, असा सवाल समाज माध्यमातून उपस्थित होत आहे.

ठोस कृतीची गरज: समाजात तेढ वाढण्याचा धोका!… गोवंश हत्या थांबवण्यासाठी केवळ आरोप-प्रत्यारोप किंवा राजकीय भूमिका घेऊन हा प्रश्न सुटणार नाही. हिंदुत्ववादी संघटना आणि मुस्लिम नेते दोघांनीही या गंभीर विषयावर एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. संबंधित पोलीस आणि पालिका प्रशासनावर हे कत्तलखाने आणि गोवंश कत्तली मुळासकट नेस्तनाबूत करण्यासाठी दबाव वाढवणे आवश्यक आहे. जर हे प्रकार असेच सुरू राहिले, तर समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच, संगमनेरातील गोवंश हत्याकांडाच्या वाढत्या घटनांनी स्थानिक पोलीस, अहिल्यानगर एलसीबी, नगरपालिका प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता हे सर्वजण खऱ्या अर्थाने कृती करणार की केवळ ‘बोलघेवडेपणा’ सुरू ठेवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. येथील बेकायदेशीर कत्तलखाने आणि या कत्तलखान्यांच्या माध्यमातून होणाऱ्या कोट्यावधीच्या उलाढालीप्रश्नी संगमनेरकरांना आता नुसते ‘बोलबच्चन’ नको, तर ठोस कृती हवी आहे!
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,030
कत्तलखाने
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
व्याख्यान

धर्माची ग्लानी सर्वप्रथम माणसाच्या अंतःकरणात होते : डॉ. संजय मालपाणी; संगमनेरमध्ये नृत्यवंदनेने ‘मनशांती व जीवनविकास व्याख्यानमाले’चा समारोप

By Annant Ppangarkar26/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: कर्म करणे ही जीवनाची अपरिहार्यता आहे; मात्र त्या…

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांना लुटणारी टोळी जेरबंद; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन गुन्ह्यांचा उलगडा

26/08/2026

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेला मिळाले हे आंतरराष्ट्रीय मानांकन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कॉर्पोरेट ट्रेनिंग हॉलचे उद्घाटन

26/08/2026

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.