Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिक-पुणे महामार्गावर अपघात: आयशर टेम्पो आणि बस यांच्यात धडक; एक गंभीर जखमी
अपघात

नाशिक-पुणे महामार्गावर अपघात: आयशर टेम्पो आणि बस यांच्यात धडक; एक गंभीर जखमी

भारती यांनी अपघातानंतर तातडीने ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी, संगमनेर येथे आणि त्यानंतर वाय.सी.एम. हॉस्पिटल भोसरी, पुणे येथे उपचार घेतले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी

नाशिक-पुणे महामार्गावर अमृतवाहिनी कॉलेजजवळ आयशर टेम्पो आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी झाला. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतवाहिनी कॉलेज जवळ गुंजाळ शॉपीसमोर २३ मे रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. या संदर्भात मंगळवारी अवधुत धोंडीबुवा भारती (वय ३५, रा. जाधववाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. हिप्परगा, पोस्ट हाडोली बी.एस., ता. कंधार, जि. नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते २३ मे रोजी पहाटे ४ वाजता आपला आयशर टेम्पो (क्र. एमएच ०५ डीके १६२५) घेऊन नाशिक-पुणे रोडने जात होते. त्यावेळी अमृतवाहिनी कॉलेजजवळ गुंजाळ शॉपीसमोर प्रभू तुकाराम लोखंडे (वय ५४, रा. कावलगाव, ता. पूर्णा, जि. परभणी, सध्या रा. तळेगाव माळेवाडी, जि. पुणे) यांनी त्यांच्या ताब्यातील बस (क्र. एमएच ०९ एफएल ००७) हयगयीने आणि भरधाव वेगात रॉंग साईडने चालवून फिर्यादीच्या टेम्पोला समोरून जोरदार धडक दिली.

या अपघातात अवधुत भारती यांना गंभीर दुखापत झाली असून, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अपघातावेळी फिर्यादीचा मोबाईलही कुठेतरी पडून गहाळ झाला आहे. अवधुत भारती यांनी अपघातानंतर तातडीने ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी, संगमनेर येथे आणि त्यानंतर वाय.सी.एम. हॉस्पिटल भोसरी, पुणे येथे उपचार घेतले. उपचारानंतर त्यांनी १० जून रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. अपघातानंतर औषधोपचार घेत असल्याने फिर्याद देण्यास विलंब झाल्याचे कारण त्यांनी सांगितले.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुरनं ५३६/२०२५ भादंवि कलम २७९, ३३८, ४२७, सह कलम १८४ मोटर वाहन अधिनियम प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार गवळी हे करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,316
अपघात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

माजी खासदारावर गुन्हा दाखल

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम…

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.