Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी मार्गावरील गैरसोय टाळण्यासाठी आमदार खताळ यांच्या सक्त सूचना
धार्मिक

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी मार्गावरील गैरसोय टाळण्यासाठी आमदार खताळ यांच्या सक्त सूचना

यावेळी आमदार खताळ यांनी संगमनेर तालुक्यात पालखीचे आगमन होणे हा अहमदनगर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद क्षण असल्याचे म्हटले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या पालखीतील वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या आहेत. पारेगाव बुद्रुक येथे पालखीचा मुक्काम असतो आणि यावर्षी वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

आमदार खताळ यांनी पारेगाव येथे ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला. गेल्या वर्षी पावसाने वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती, त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी व अन्य विभागांना गंभीरपणे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, आमदार खताळ यांनी यंदा प्रथमच वारकऱ्यांसाठी तीन वॉटरप्रूफ मंडपांची उभारणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. यासाठी महायुती सरकारने ५ लाख रुपये, ग्रामपंचायतीसाठी २ लाख रुपये आणि २५० शौचालये व स्नानगृहांसाठी २०० युनिट उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

आरोग्य सेवेसाठी तात्पुरत्या स्वरूपातील दवाखाने सज्ज ठेवण्याचे, पिण्याच्या पाण्याची आणि वीज पुरवठ्याची सोय करण्याचे निर्देश आमदार खताळ यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शाम मिसाळ यांच्याकडून त्यांनी पालखी मार्गाच्या कामाची माहिती घेतली. मार्गाच्या कामासाठी मंत्री विखे पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि उरलेल्या दिवसात साईडपट्ट्यांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी आमदार खताळ यांनी संगमनेर तालुक्यात पालखीचे आगमन होणे हा अहमदनगर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद क्षण असल्याचे म्हटले. त्यामुळे या पालखीचे स्वागत चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या समन्वयातून चांगले नियोजन झाले आहे. पालखीच्या स्वागतासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित राहावे अशी विनंती त्यांनी केली असून, जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी, वारकरी सांप्रदायातील कार्यकर्ते आणि नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या बैठकीला तहसीलदार धीरज मांजरे, अतिरिक्त गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, उपकार्यकारी अभियंता शाम मिसाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि अधिकारी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 891
अमोल खताळ बैठक संत निवृत्तीनाथ महाराज पालखी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.