Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये चाललय काय? आता गुळात भेसळीची तक्रार; अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
आरोग्य

संगमनेरमध्ये चाललय काय? आता गुळात भेसळीची तक्रार; अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

या गुळात कृत्रिम रंग आणि डिटर्जंट पावडरचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप ढमाले यांनी केला आहे. त्यांनी या गुळाचे नमुने स्वतःजवळ ठेवले असून, त्याची तातडीने तपासणी करण्याची मागणी केली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

संगमनेर शहर आणि तालुक्यात अन्नपदार्थांमधील भेसळीच्या वाढत्या तक्रारींनी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) यापूर्वी अनेक ठिकाणी छापे टाकून संशयित नमुने गोळा केले असले, तरी अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. आता संगमनेरमध्ये गुळात भेसळ झाल्याची गंभीर तक्रार समोर आल्याने, प्रशासन यावर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संगमनेर येथील ‘सिद्धी नैसर्गिक गुळ’ या दुकानाचे विक्रेते आणि निर्माते मोहनलाल बन्सीलाल दर्डा यांच्याविरुद्ध शंकर ढमाले यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ढमाले यांनी केली आहे.

रासायनिक भेसळीमुळे त्रास झाल्याचा आरोप ढमाले यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, एका विशिष्ट कंपनीचा गुळ खाल्ल्यानंतर त्यांना तीव्र पोटात वेदना झाल्या आणि त्यांना थेट रुग्णालयात दाखल होऊन उपचार घ्यावे लागले. यापूर्वीही गुळ खाल्ल्यानंतर अशाच प्रकारचा त्रास होऊन रुग्णालयात उपचार घ्यावे लागल्याचे त्यांनी नमूद केले आहे. वैद्यकीय अहवालानुसार, ही अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या गुळात कृत्रिम रंग आणि डिटर्जंट पावडरचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप ढमाले यांनी केला आहे. त्यांनी या गुळाचे नमुने स्वतःजवळ ठेवले असून, त्याची तातडीने तपासणी करण्याची मागणी केली आहे.

वाढत्या भेसळीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? संगमनेर शहर व तालुक्यात अन्नभेसळीचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत. नामांकित मिठाईची दुकाने, किराणा दुकाने, तसेच तेल, गुळ, खवा यांसारख्या नित्याच्या अन्नपदार्थांमध्ये भेसळ असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वीही झाल्या आहेत. एफडीएने संशयित पदार्थांचे नमुने घेतले असले, तरी यावर ठोस कारवाईची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या भेसळखोरांवर कधी अंकुश लावला जातो, याकडे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,485
अन्न व औषध प्रशासन विभाग भेसळ शंकर ढमाले
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.