Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » म्हाळुंगी पुलाचे श्रेय बाळासाहेब थोरात यांनाच; सत्ताधाऱ्यांवर सोमेश्वर दिवटेंचा पुन्हा निशाणा
राजकारण

म्हाळुंगी पुलाचे श्रेय बाळासाहेब थोरात यांनाच; सत्ताधाऱ्यांवर सोमेश्वर दिवटेंचा पुन्हा निशाणा

वस्तुस्थिती माहिती असल्याने नागरिकांनीही या पुलाच्या कामासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांचे आभार मानल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/06/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवर नव्याने बांधलेल्या पुलाचे श्रेय माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचेच असल्याचा दावा काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केला आहे. तसेच, सत्तांतरानंतर सत्ताधाऱ्यांनी केवळ राजकारणासाठी पुलाचे काम रखडवल्याचा आरोप करत त्यांनी पुलाच्या कामाचे श्रेय घेऊ पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा आरसा दाखवला. 

या संदर्भात दिवटे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पुलाच्या रखडलेल्या कामाचा घटनाक्रम विशद करत म्हटले आहे की, २०२२ मध्ये म्हाळुंगी नदीला आलेल्या पुरामुळे साईनगरकडे जाणारा जुना पूल खचला होता. पूल वाहतुकीला बंद झाल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात आणि नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी तातडीने पाहणी केली होती. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून तात्पुरता पूल उभारण्यात आला. त्यानंतर साईनगर, घोडेकर मळा आणि गंगामाई घाटाकडे जाणारा पूल भक्कम व्हावा यासाठी बाळासाहेब थोरात यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता.

मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुलाचे काम रखडले. त्यानंतर पालकमंत्री आणि त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केवळ राजकारण करण्यासाठी मंजूर झालेला निधी न मिळवता सुरू असलेल्या नगरपालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचा निधी या पुलासाठी वळवला आणि त्यामुळे कामाला विलंब झाला. पुलाच्या बांधणीसाठी शालेय विद्यार्थी, परिसरातील रहिवासी आणि नागरिकांकडून सातत्याने मागणी होत होती, तसेच म्हाळुंगी नदी पूल कृती समितीनेही यासाठी आंदोलन केले होते. तरीही, राजकीय सोयीसाठी हे काम थांबवले गेले, असे दिवटे यांनी म्हटले आहे.

जनतेच्या विकासासाठी राजकारण करायचे असते हा मंत्र लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने जपला आहे, असे दिवटे यांनी अधोरेखित करत थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर हायटेक आणि वैभवशाली बनले. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत असून, निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन योजनेमुळे कडक उन्हाळ्यातही संगमनेरकरांना मुबलक पाणी उपलब्ध होते, असे सांगितले.

संगमनेरमध्ये हायटेक बस स्थानक, नगरपालिका, न्यायालय इमारत, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, शासकीय विश्रामगृह, कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह यांसारख्या पायाभूत सुविधा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकसित करण्यात आल्या आहेत. याशिवाय, प्रवरा नदीवर चार पूल आणि बायपाससारख्या मोठ्या विकास योजनाही राबवण्यात आल्या आहेत. संगमनेर शहर स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळखले जाते, यासाठी नगरपालिकेला राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘हिरवाईचे सुरक्षित शहर’ म्हणून संगमनेरने राज्यात आपली ओळख निर्माण केली आहे, असेही दिवटे यांनी नमूद केले.

पुलाच्या उभारणीचे श्रेय थोरात यांनाच – साईनगर परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी म्हाळुंगी पूल लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला होता. आता पूल सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत असून, या पूल उभारणीचे सर्व श्रेय माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचेच असल्याचे सोमेश्वर दिवटे यांनी ठामपणे सांगितले.

वस्तुस्थिती माहिती असल्याने नागरिकांनीही या पुलाच्या कामासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांचे आभार मानल्याचे त्यांनी म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,315
म्हाळुंगी पूल सोमेश्वर दिवटे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.