Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुक्याच्या सीमेवर संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, इंद्रजीत थोरातांनी केले स्वागत, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांकडून वारकऱ्यांसाठी सुविधा
धार्मिक

संगमनेर तालुक्याच्या सीमेवर संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, इंद्रजीत थोरातांनी केले स्वागत, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांकडून वारकऱ्यांसाठी सुविधा

रिमझिम पावसातही वारकरी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने दिंडीत सहभागी झाले होते. हरिनामाचा गजर करत, टाळ-मृदंगाच्या तालावर अभंग गात, पालखीने नाशिक जिल्ह्याची वेस ओलांडून अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश केला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संत निवृत्तीनाथ दिंडीची विविध छायाचित्रे

संगमनेर, प्रतिनिधी –

शेकडो वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज (सोमवारी, १६ जून) अहिल्यानगर जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात आगमन झाले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत उद्योग समूहाने वारकऱ्यांसाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधा पुरविल्या. रिमझिम पाऊस आणि भक्तीमय वातावरणात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि इंद्रजीत थोरात यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी या पालखीचे अभूतपूर्व स्वागत व पूजन केले.

पारेगाव बुद्रुक येथे पंढरपूरकडे निघालेल्या या पालखीमध्ये सुमारे २० हजार वारकरी सहभागी झाले होते. यावेळी डॉ. तांबे आणि थोरात यांनी पालखीचे पूजन केले. या प्रसंगी निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ घोटेकर, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक देविदास ढूमने, ॲड. त्र्यंबकराव गडाख, साहेबराव गडाख, दौलत गडाख, सोमनाथ गडाख, सचिन गडाख, बी. आर. चकोर, विजय राहणे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

रिमझिम पावसातही वारकरी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने दिंडीत सहभागी झाले होते. हरिनामाचा गजर करत, टाळ-मृदंगाच्या तालावर अभंग गात, पालखीने नाशिक जिल्ह्याची वेस ओलांडून अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश केला. अश्विनाथ विद्यालयाचे लेझीम पथक, पारंपरिक वाद्ये आणि वेशभूषा करून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले. अनेक वारकऱ्यांनी फुगड्या खेळल्या, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले आणि सर्वांसमवेत अभंग गायले. हरिनामाच्या गजराने आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

“विठ्ठलाची पायी वारी ही महाराष्ट्राची एक महान संस्कृती आहे. यात गरीब-श्रीमंत, लहान-थोर असे सर्वजण कोणताही भेदभाव विसरून एकत्र येतात आणि आनंदाने पांडुरंगाच्या चरणी लीन होतात. ही महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक व धार्मिक परंपरा आहे. यावर्षीही राज्यात भरपूर पाऊस पडू दे आणि शेतकरी सुखी होऊ दे, अशी प्रार्थना यावेळी केली.”- इंद्रजीत थोरात.

“संत निवृत्तीनाथ महाराज पालखीला मोठी परंपरा आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. वारकरी संप्रदाय हा हजारो वर्षांपूर्वीचा असून तो सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे. जात-पात, धर्म हा कोणताही भेदभाव या संप्रदायात नाही. असा हा सांस्कृतिक सोहळा जगासाठी आदर्शवत आहे.” – डॉ. सुधीर तांबे.

बाळासाहेब थोरात यांच्याकडून वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे दरवर्षी अहमदनगर जिल्ह्यात पालखीचे आगमन होताच उपस्थित राहून स्वागत करतात. यंदा ते दिल्लीत असल्याने त्यांनी दूरध्वनीवरून वारकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच, त्यांनी वारकऱ्यांसाठी एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णवाहिका, आणि अमृत उद्योग समूहातील संस्थांमार्फत राहण्याची सोय, पिण्याच्या पाण्याचा टँकर, दवाखाना, वीज यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना ‘यशोधन’ आणि ‘अमृत उद्योग समूहांना’ दिल्या आहेत. संगमनेर तालुक्यातून दिंडी मार्गस्थ होईपर्यंत सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,096
संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सुधीर तांबे स्वागत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.