Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये वीज मंडळाचा अनागोंदी कारभार; शिवसेना शहरप्रमुख रवींद्र कानकाटेंचा तीव्र संताप
सामाजिक

संगमनेरमध्ये वीज मंडळाचा अनागोंदी कारभार; शिवसेना शहरप्रमुख रवींद्र कानकाटेंचा तीव्र संताप

यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा कानकाटे यांनी दिला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/06/2025Updated:17/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, १७ जून 

पावसाळ्याला सुरुवात होताच संगमनेर विद्युत महामंडळाचा (महावितरण) गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. शहरातील अनेक उपनगरे आणि गावठाण भागांत विजेचा लपंडाव सुरू असून, यामुळे नागरिक आणि विशेषतः छोटे व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. शिवसेना शहरप्रमुख रवींद्र उर्फ पप्पू कानकाटे यांनी महावितरणच्या या निष्क्रियतेवर तीव्र संताप व्यक्त करत, अधिकाऱ्यांना गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे.

कानकाटे यांनी आरोप केला आहे की, वादळ, वाऱ्यामुळे झाडे पडून किंवा तारा तुटून वीजपुरवठा खंडित होणे नागरिकांना समजण्यासारखे आहे. मात्र, दर शनिवारी शहरातील जवळपास ७०-७५ टक्के भागात दिवसभर वीज गायब असते. रविवारी कोणतेही कारण नसतानाही विजेचा ये-जा करण्याचा खेळ सुरू होता. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या या हलगर्जीपणामुळे अनेक छोटे व्यावसायिक, ज्यांचे व्यवसाय पूर्णपणे विजेवर अवलंबून आहेत, त्यांचे मोठे नुकसान होत आहे. यात सलून व्यावसायिक, पिठाच्या गिरणीचे दुकानदार, आईस्क्रीम पार्लरधारक अशा सुमारे ७५ टक्के व्यावसायिकांना विजेअभावी आपला व्यवसाय चालवता येत नाही.

महावितरणने नागरिकांसाठी दिलेला संपर्क क्रमांक (०२४२५-२२५९२५) अनेकदा अनुपलब्ध असतो किंवा तिथे योग्य कर्मचारी नसतात. यामुळे नागरिक आपली तक्रार नोंदवू शकत नाहीत आणि त्यांची अडचण कुणी ऐकून घेत नाही.

कानकाटे यांनी महावितरणवर दुहेरी धोरणाचाही आरोप केला आहे. महावितरण गरीब ग्राहकांच्या अडचणी ऐकून न घेता त्वरित वीजपुरवठा खंडित करते, तर दुसरीकडे धनदांडग्यांकडून ‘चिरीमिरी’ घेऊन त्यांना सूट दिली जाते. हे पक्षपाती धोरण त्वरित बंद करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय, शहरातील विद्युत खांबांवर अनेक अनावश्यक तारा आणि वायरींचा मोठा गोंधळ वाढला आहे, ज्यामुळे शहराचे विद्रूपीकरण झाले आहे. याकडेही महावितरणचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे कानकाटे यांनी म्हटले असून, हा गोंधळ कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

कानकाटे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की, जर विजेचा लपंडाव थांबला नाही आणि संपर्क क्रमांकावर योग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून प्रत्येक तक्रार नोंदवून घेतली नाही, तर संगमनेर शहर शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या कार्यालयाला होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस संबंधित अधिकारी स्वतः जबाबदार असतील. शिवसेनेने या गंभीर समस्येकडे महावितरणचे लक्ष वेधले असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा कानकाटे यांनी दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 7,646
रवींद्र कानकाटे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यादी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम…

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.