Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरात वारकऱ्यांची उत्तम सोय; दिंडीला २५ डॉक्टरांच्या पथकाकडून आरोग्य सुविधांसह विविध सेवा
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरात वारकऱ्यांची उत्तम सोय; दिंडीला २५ डॉक्टरांच्या पथकाकडून आरोग्य सुविधांसह विविध सेवा

अमृत उद्योग समूह आणि यशोधन कार्यालयाच्या वतीने पुरवण्यात आलेल्या विविध सुविधांबद्दल सुमारे २५,००० वारकऱ्यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला. हरिनामाच्या गजरात हे वारकरी आता पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी- 

महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध परंपरेचा भाग असलेल्या पायी दिंडी सोहळ्यातील संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे संगमनेर तालुक्यात सोमवारी आगमन झाले आहे. या निमित्ताने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि इतर विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, यामुळे वारकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि इंद्रजीत थोरात यांनी तिचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पालखीचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ घोटेकर यांच्यासह गावकरी आणि वारकऱ्यांशी संवाद साधला.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसएमबीटी सेवाभावी संस्थेच्यावतीने दोन रुग्णवाहिका, २५ डॉक्टरांचे पथक आणि परिचारिकांसह आरोग्य सेवा पुरवण्यात आली आहे. प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याचे टँकर, वारकऱ्यांसाठी चहा, नाष्टा आणि निवासाची सोय अशा अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इंद्रजीत थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृत उद्योग समूहाच्यावतीने आणि विविध सहकारी संस्थांनी दरवर्षीप्रमाणे ही सेवा दिली आहे. पहिल्याच दिवशी ११८९ वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. दिंडीमध्ये सहभागी होणारे वारकरी दरवर्षी संगमनेर तालुक्यात आल्यावर त्यांची अत्यंत चांगली सोय केली जाते, यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असते. 

अमृत उद्योग समूह आणि यशोधन कार्यालयाच्या वतीने पुरवण्यात आलेल्या विविध सुविधांबद्दल सुमारे २५,००० वारकऱ्यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला. हरिनामाच्या गजरात हे वारकरी आता पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत.

दिंडीचे प्रमुख ॲड. सोमनाथ घोटेकर म्हणाले की, संत निवृत्तीनाथ महाराज पालखीला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. या पालखीचे दरवर्षी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चांगले स्वागत होते. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे वारकरी संप्रदायाचे पाईक असून, त्यांनी कायमच वारकऱ्यांची काळजी घेतली आहे आणि त्यांना चांगल्या सुविधा पुरवल्या आहेत.

ॲड. त्रिंबक गडाख यांनी सांगितले की, इंद्रजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सर्व पाहणी करण्यात आली आणि आवश्यक त्या बाबी पुरवण्यात आल्या. वारकरी हे अतिथी असून, त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्याची परंपरा संगमनेर तालुक्याने कायम जपली आहे, असेही ते म्हणाले.

कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा असून, वारीमध्ये लहान-मोठा, जात-धर्म असा कोणताही भेदभाव नसतो. सर्वजण एकरूप होऊन पांडुरंगाच्या चरणी लीन होतात आणि ‘माऊली’ म्हणून एकमेकांचा आदर करतात. या वारकऱ्यांची आरोग्य सेवा करणे हा मोठा आनंद आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 966
एसएमबीटी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धांदरफळ बुद्रुक गावाच्या शिवारातील बाजारतळावर नवरात्रोत्सवानिमित्ताने…

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.