Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सार्वजनिक बांधकाम विभागाचा अतिक्रमण करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेला दणका: रस्त्यावरील अतिक्रमण ७ दिवसात काढण्याचे आदेश
प्रशासन

सार्वजनिक बांधकाम विभागाचा अतिक्रमण करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेला दणका: रस्त्यावरील अतिक्रमण ७ दिवसात काढण्याचे आदेश

यामुळे रस्त्याची बाजूपट्टी पूर्णपणे अडविण्यात आली असून, वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर, प्रतिनिधी:
रस्त्याच्या बाजूपट्ट्यावर अतिक्रमण करून विनापरवाना संरक्षक भिंत आणि पाण्याच्या टाकीचे बांधकाम केल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोल्याच्या उप अभियंत्यांनी चंदनापुरी (संगमनेर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना एका नोटीसद्वारे चांगलाच दणका देत सात दिवसाच्या आत अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश बजावले आहे.
शाळेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या अतिक्रमणाविरुद्ध सार्वजनिक बांधकाम विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. या रस्त्यावर ४/४०० ते ५/४०० किलोमीटर दरम्यान झालेल्या बेकायदेशीर बांधकामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमणधारकांना ही नोटीस बजावली असून, नोटीसच्या माध्यमातून ही अतिक्रमणे तातडीने काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.
या संदर्भात उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. २, अकोले यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या पत्रानुसार, चंदनापुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम आणि पाण्याच्या टाकीचे बांधकाम रस्त्याच्या बाजूवर, विभागाच्या परवानगीशिवाय करण्यात आले आहे. यामुळे रस्त्याची बाजूपट्टी पूर्णपणे अडविण्यात आली असून, वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, संबंधित बांधकाम धारकांनी सात दिवसांच्या आत ही अतिक्रमणे स्वतः काढून टाकावीत. अन्यथा, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ती काढून टाकण्यात येईल आणि त्याचा खर्च संबंधित अतिक्रमणधारकांकडून वसूल केला जाईल. तसेच, संरक्षक भिंतीचे बांधकाम न काढल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
या पत्राची प्रत संगमनेर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी व गटविकास अधिकारी, चंदनापुरी ग्रामपंचायतचे सरपंच, संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना पाठविण्यात आली आहे.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,012
अतिक्रमण अतिक्रमण कारवाई जिल्हा परिषद शाळा चंदनापुरी नोटीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.