Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्हाधिकाऱ्यांचे सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्रांवर अचानक तपासणीचे आदेश
बैठक

जिल्हाधिकाऱ्यांचे सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्रांवर अचानक तपासणीचे आदेश

संशयास्पद गर्भपातांच्या प्रकरणांची सखोल चौकशी केली जाईल. तसेच, गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने नियमित तपासणी करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, २६ जून: 

जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण सुधारण्यासाठी आणि बेकायदेशीर गर्भपातांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रे आणि गर्भपात केंद्रांची अचानक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी विशेष पथके तयार करून ही तपासणी केली जाणार आहे.

बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांच्यासह आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

डॉ. आशिया यांनी बैठकीत सांगितले की, जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण सुधारण्यासाठी सोनोग्राफी केंद्रे आणि गर्भपात केंद्रे यांची तपासणी अत्यंत आवश्यक आहे. या तपासणीदरम्यान, संशयास्पद गर्भपातांच्या प्रकरणांची सखोल चौकशी केली जाईल. तसेच, गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने नियमित तपासणी करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

गर्भपात रोखण्यासाठी केवळ तपासणीच नाही, तर जनजागृती आणि पाठपुरावा देखील महत्त्वाचा आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला गर्भवती महिलांचा नियमित पाठपुरावा करण्यास आणि समाजामध्ये लिंग गुणोत्तराच्या महत्त्वाविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवण्यास सांगितले.

या बैठकीत जन्म-मृत्यू नोंदणी आणि साथरोग परिस्थितीचाही आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व खाजगी रुग्णालयांना डेंग्यूचे निदान झालेल्या प्रत्येक रुग्णाची माहिती शासकीय आरोग्य यंत्रणेला त्वरित देण्याचे निर्देश दिले. तसेच, जन्म-मृत्यूची नोंद करणे कायद्याने बंधनकारक असल्याने, ज्या रुग्णालयांमध्ये जन्म किंवा मृत्यू होईल, त्या वैद्यकीय व्यावसायिकांनी या घटनांची नोंद करून आरोग्य विभागाला माहिती कळवणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 710
गर्भ लिंग निदान तपासणी पंकज आशिया सोनोग्राफी केंद्र
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेर तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा: मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश… उपअभियंता सक्तीच्या रजेवर, तर योजनांचे होणार थर्ड पार्टी ऑडिट

07/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026

अवैध धंद्यांवर ‘मोक्का’, ‘एमपीडीए’नुसार कठोर कारवाई करा: अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियांचे संगमनेरात निर्देश

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम…

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.