Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘स्वच्छ शहर’ संगमनेरवर अस्वच्छतेचे सावट: नागरिकांचा पालिकेवर एल्गार… माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतापले
राजकारण

‘स्वच्छ शहर’ संगमनेरवर अस्वच्छतेचे सावट: नागरिकांचा पालिकेवर एल्गार… माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतापले

तत्कालीन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आणि दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात 'स्वच्छ शहर, सुंदर शहर' ही संकल्पना अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात आली होती. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय अनास्थेमुळे शहराची ही ओळख पुसली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर, प्रतिनिधी: 
एकेकाळी ‘स्वच्छ आणि सुंदर शहर’ म्हणून राज्य व देशपातळीवर नावलौकिक मिळवलेल्या संगमनेर शहरावर सध्या अस्वच्छतेचे मोठे सावट पसरले आहे. शहरातील वाढलेल्या दुर्गंधी, कचऱ्याचे ढीग आणि रोगराईच्या धोक्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी, (२७ जून) माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगर परिषदेवर जोरदार ‘एल्गार’ मोर्चा काढला. प्रशासनाच्या उदासीन आणि मनमानी कारभारावर नागरिकांनी यावेळी तीव्र संताप व्यक्त केला.
गेल्या काही वर्षांपासून संगमनेर शहराने स्वच्छतेच्या बाबतीत अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पारितोषिके मिळवून एक आदर्श निर्माण केला होता. तत्कालीन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आणि दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ ही संकल्पना अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात आली होती. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय अनास्थेमुळे शहराची ही ओळख पुसली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.
या मोर्चादरम्यान प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नागरिकांनी अनेक गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले आहे. शहरात गाई, कुत्री आणि डुकरे मोकाट फिरत असून त्यामुळे अपघात व अस्वच्छता वाढली आहे. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होत नाही, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून ते वेळेवर उचलले जात नाहीत आणि घंटागाडी देखील वेळेवर येत नाही. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली असून डासांचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या साथीच्या आजारांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय, कचरा डेपोचा अक्षरशः डोंगर झाला असून म्हाळुंगी नदीच्या काठावरही अस्वच्छतेचा कहर पाहायला मिळतो.
या मोर्चात माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, नितीन अभंग, गणेश मादास, प्रमिला अभंग, ॲड. प्रमोद कडलग, निखिल पापडेजा, मुस्ताक शेख, वैष्णव मुर्तडक, मनोज यंगदाल, राजेंद्र वाकचौरे, मिलिंद औटी, सुरेश झावरे, लक्ष्मण बर्गे, वैशाली बर्गे, सुविधा आरसिद्ध, अनिता साळवे, अंबादास आडेप, योगेश जाजू, सुभाष दिघे, स्वप्निल गुंजाळ, मिश्रा भाभी, सचिन खाडे, किशोर बोराडे, प्रमोद गणोरे, सचिन वामन, नूर मोहम्मद खान, डॉ. दानिश पठाण, सागर कानकाटे, अक्षय गुंजाळ, विजय पांढरे, शैलेश कलंत्री, गजेंद्र अभंग, सौदामिनी कान्होरे, सुनीता कांदळकर, विशाल वैराळ आदींसह विविध प्रभागांतील शेकडो नागरिक आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.
पालिकेचे मुख्याधिकारी बाहेरगावी असल्याने निवेदन डेप्युटी मुख्याधिकारी संजय टेकाळे, प्रशांत जुन्नरे, राजेंद्र गुंजाळ आणि अमजद शेख यांनी स्वीकारले. नागरिकांनी यावेळी प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला, यामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

यावेळी बोलताना दुर्गाताई तांबे यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. त्या म्हणाल्या की, स्वच्छतेसाठी मिळालेल्या सुमारे १० कोटींच्या पारितोषिकांमुळे शहरात रस्ते, उद्याने आणि इतर विकासकामे करणे शक्य झाले. मात्र, आता स्वच्छतेची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. शहरातील आरोग्यव्यवस्था धोक्यात आली असून, उंदीर, घुशी आणि डासांचा त्रास वाढला आहे. प्रशासनाचे याकडे कोणतेही लक्ष नाही. प्रशासनाने तातडीने स्वच्छतेकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 872
दुर्गाताई तांबे मोर्चा समस्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.