Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » थोरात कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी AI तंत्रज्ञानाचा वापर
शेती व सहकार

थोरात कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी AI तंत्रज्ञानाचा वापर

ऊस शेतीमध्ये बारामती ॲग्रीकल्चर ट्रस्टने या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांच्या जीवनात आनंद निर्माण करत उच्चांकी भाव दिला आहे. आता महाराष्ट्रात ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याने, कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रात ऊस वाढ कार्यक्रमांतर्गत नवीन AI वापरासाठी प्रात्यक्षिक प्लॉट तयार करण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी केले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीबद्दल अधिक माहिती देताना घुले म्हणाले की, जागतिक स्तरावर शेती, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये AI चा वापर वाढला आहे. ऊस शेतीमध्ये बारामती ॲग्रीकल्चर ट्रस्टने या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला आहे. या प्रणालीमुळे जमिनीच्या पोतानुसार आवश्यक खते, उसावर आलेली बुरशी, आणि कीटकनाशकांचा वापर याबाबतची माहिती तात्काळ शेतकऱ्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होईल. 

त्याचबरोबर, उसाच्या फुटव्यांची संख्या आणि त्यांची वाढ समान ठेवण्यात यश मिळेल. प्रायोगिक तत्त्वावर असे सिद्ध झाले आहे की, या पद्धतीमुळे अंदाजे ऊस उत्पादनात 30 ते 40 टक्के वाढ होते, पाण्याची 30 टक्के बचत होते, तर खते, रोग आणि कीड नियंत्रण औषधांच्या खर्चात 40 ते 50 टक्के बचत होते.

थोरात कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर करण्यासाठी 25 शेतकऱ्यांचे समूह गट तयार करण्यात येणार आहेत. गटनिहाय ऊस पीक प्रात्यक्षिक प्लॉट तयार करण्यात येतील, यात त्या भागातील शेतकऱ्यांचा आर्थिक सहभाग असेल. ही प्रणाली पूर्व हंगाम आणि सुरू हंगामासाठी उपलब्ध असेल. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शेतकरी नियमित ऊस पिकवणारा असावा, अँड्रॉइड मोबाईल वापरणारा असावा आणि दिलेल्या सूचनांचे पालन करणारा असावा. तसेच, भरपूर पाणी उपलब्ध असले तरी ठिबक सिंचनाचा वापर करणे अनिवार्य असेल.

याबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या शेती व ऊस विभागाशी संपर्क साधावा किंवा गट ऑफिसमध्ये आपली नावनोंदणी 20 जुलै 2025 पर्यंत करावी, असे आवाहन सर्व संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक मंडळांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,265
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान थोरात कारखाना पांडुरंग घुले
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

18/07/2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

15/07/2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

13/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर : खरीप हंगामातील पिकांची वाढती गरज आणि पिण्याच्या…

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.