Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लिहिले पत्र, पहा काय केली विनंती; थोरातांचे पत्र चर्चेत!
राजकारण

माजी मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लिहिले पत्र, पहा काय केली विनंती; थोरातांचे पत्र चर्चेत!

गेल्या दोन वर्षांपासूनही थोरात यांनी कालव्यांमधून पाणी सोडण्याची मागणी केली होती आणि त्यावेळी प्रशासनाने पाणी सोडल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला होता.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

भंडारदरा आणि निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रात मे आणि जून महिन्यांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने धरणांमध्ये पाण्याची चांगली उपलब्धता आहे, यामुळे नदीमार्गे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, याच्या उलट परिस्थिती निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात आहे, लाभक्षेत्रात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. ही बाब लक्षात घेऊन, निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांमधून तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते आणि माजी जलसंपदामंत्री बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जलसंपदा मंत्र्यांना लिहिलेले पत्र चर्चेत आले असून आपल्या पत्रात थोरात यांनी म्हटले आहे की, भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पाण्याची आवक समाधानकारक आहे आणि मोठ्या प्रमाणात विसर्ग नदीमार्गे सुरू आहे. याउलट, निळवंडे धरणाचे लाभक्षेत्र पर्जन्यछायेखाली येत असल्याने तिथे अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे या भागात शेतीसाठी आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या कायम आहे. हा विरोधाभास लक्षात घेता, निळवंडे धरणातील अतिरिक्त (ओव्हरफ्लो) पाणी तातडीने डाव्या आणि उजव्या कालव्यांमधून सोडणे अत्यंत आवश्यक असल्याचे थोरात यांनी अधोरेखित केले.

थोरात यांच्या मते, या दुष्काळी पट्ट्यात आताच पाणी सोडल्यास ते अडवले जाईल आणि जमिनीत जिरवले जाईल. यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती सिंचनाखाली येईल आणि शेतकऱ्यांना वर्षभर त्याचा फायदा मिळेल. त्यामुळे निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी डाव्या आणि उजव्या दोन्ही कालव्यांमधून पाणी सोडण्याचा निर्णय तात्काळ घेण्यात यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

गेल्या दोन वर्षांपासूनही थोरात यांनी कालव्यांमधून पाणी सोडण्याची मागणी केली होती आणि त्यावेळी प्रशासनाने पाणी सोडल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला होता. दुष्काळी भागातील 182 गावांना सिंचनाचा लाभ मिळावा यासाठी बाळासाहेब थोरात यांनीच या धरणाची निर्मिती केली आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात ते नेहमीच मदतीला धावून आल्याचे सर्वश्रुत आहे. या मागणीमुळे निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,055
निळवंडे धरण पत्र पाण्याचे राजकारण बाळासाहेब थोरात राधाकृष्ण विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.