Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » १ जानेवारी २०२५ पर्यंतचे तुकडाबंदी व्यवहार नियमित होणार; आमदार अमोल खताळ यांच्या लक्षवेधीच्या उत्तरात महसूल मंत्र्यांची माहिती
राजकारण

१ जानेवारी २०२५ पर्यंतचे तुकडाबंदी व्यवहार नियमित होणार; आमदार अमोल खताळ यांच्या लक्षवेधीच्या उत्तरात महसूल मंत्र्यांची माहिती

सद्यस्थितीत तुकडाबंदी कायद्यामुळे एक किंवा दोन गुंठे जागा घेतलेल्या नागरिकांना बांधकाम करण्यास किंवा त्या जागांचे व्यवहार करण्यास अडचणी येत होत्या.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/07/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई: 

नगर पालिका हद्दीत आणि हद्दीलगत नागरी वस्तीत लागू असलेल्या तुकडाबंदी कायद्यामुळे बाधित झालेल्या लाखो कुटुंबांसाठी एक आनंदाची बातमी आहे. १ जानेवारी २०२५ पर्यंत झालेले सर्व तुकडाबंदी व्यवहार नियमित केले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे. आमदार अमोल खताळ यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूलमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला.

सद्यस्थितीत तुकडाबंदी कायद्यामुळे एक किंवा दोन गुंठे जागा घेतलेल्या नागरिकांना बांधकाम करण्यास किंवा त्या जागांचे व्यवहार करण्यास अडचणी येत होत्या. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, महसूलमंत्री बावनकुळे यांनी महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगर पंचायत क्षेत्राच्या हद्दीत व हद्दीलगत तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन झालेल्या भागांमध्ये १ जानेवारी २०२५ पर्यंत झालेल्या व्यवहारांसाठी नियम शिथिल करण्याची घोषणा केली.

या संदर्भात, तुकडाबंदी कायद्यासाठी निश्चित मार्गदर्शक प्रणाली तयार करण्यासाठी राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव, मुद्रांक आयुक्त, जमाबंदी आयुक्त आणि नगरविकास सचिव यांची एक समिती नेमण्यात आली आहे. ही समिती येत्या पंधरा दिवसांत याबाबतचा अहवाल सादर करेल.

या निर्णयाबद्दल आमदार अमोल खताळ यांनी महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे तसेच जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले. महायुती सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य माणसाला मोठा दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 861
अमोल खताळ चंद्रशेखर बावनकुळे तुकडा बंदी पावसाळी अधिवेशन लक्षवेधी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर : खरीप हंगामातील पिकांची वाढती गरज आणि पिण्याच्या…

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.