Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गटार दुर्घटनेतील आणखी एकाचा मृत्यू, मृतांची संख्या दोनवर; संगमनेरकरांसह महाविकास आघाडी व महायुतीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची पोलीस ठाण्यात धाव… उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू, संगमनेरात शोकाकुल वातावरण
अपघात

गटार दुर्घटनेतील आणखी एकाचा मृत्यू, मृतांची संख्या दोनवर; संगमनेरकरांसह महाविकास आघाडी व महायुतीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची पोलीस ठाण्यात धाव… उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू, संगमनेरात शोकाकुल वातावरण

रियाज जावेद पिंजारी असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

गुरु पौर्णिमेचा दिवस संगमनेरकरांसाठी धक्कादायक आणि दुःखदायक ठरला आहे. संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या भूमिगत गटार कामादरम्यान आज घडलेल्या दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला. गटारात काम करत असताना गटारीमध्ये निर्माण झालेल्या विषारी वायूच्या संपर्कात आल्याने बेशुद्ध पडून अतुल रतन पवार या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच त्या पाठोपाठ या दुर्घटनेतील दुसऱ्या जखमीचा हे मृत्यू झाल्याचे दुःखद वृत्त समोर आले आहे.

रियाज जावेद पिंजारी असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून गटारीच्या (ड्रेनेज) कामावेळी विषारी वाळूच्या संपर्कात आल्याने बेशुद्ध होऊन जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न या तरुणाने केला होता. मात्र हा तरुण देखील वायूच्या संपर्कात आल्याने तो देखील जखमी झाला. उपचारादरम्यान त्याची प्रकृती चिंताजनक होती. अखेर त्याचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात त जखमी झालेल्या तिसऱ्या व्यक्तीवर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान डॉ. जयश्री थोरात यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली.

अतुल रतन पवार व रियाज जावेद पिंजारी या दोघांचा मृत्यू झाल्याने संगमनेरमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या दोघांच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणे काम करणाऱ्या ठेकेदारावर व त्याला सहाय्यभूत ठरणाऱ्यावर यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिक व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून होत आहे. आमदार अमोल खताळ यांनी देखील संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश स्थानिक पोलिसांना दिले आहे.

दरम्यान या दुर्घटनेनंतर संगमनेरकरांमध्ये प्रशासना विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी संगमनेरकरांची पोलीस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती. संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

घटनेची माहिती मिळताच माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, शिवसेना ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख अमर कतारी, माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, माजी उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, निखिल पापडेजा आदींसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तर महायुतीच्या ॲड. श्रीराम गणपुले, ॲड. संग्राम जोंधळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत संबंधित दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. 

तर आमदार अमोल खताळ यांनी देखील या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. दरम्यान या कामाचा ठेका दिलेला ठेकेदार, स्वच्छतेसाठी काम करणारा ठेकेदार आणि मुख्याधिकारी यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत असून शहर पोलीस याप्रकरणी नेमक कोणावर गुन्हा दाखल करतात हे लवकरच समोर येणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,130
अपघात भूमिगत गटार महायुती महाविकास आघाडी मृत्यू
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

पर्यटकांच्या भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

02/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर : खरीप हंगामातील पिकांची वाढती गरज आणि पिण्याच्या…

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.