Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर न्यायालयाने तलाठी मच्छिंद्र रहाणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला, पत्नीला जामीन!
न्यायालय

संगमनेर न्यायालयाने तलाठी मच्छिंद्र रहाणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला, पत्नीला जामीन!

तपासात अडथळा येऊ नये म्हणून मच्छिंद्र राहाणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त

संगमनेर, प्रतिनिधी: 

घर भाडेकरू असलेल्या महिला आणि तिच्या पतीला मारहाण करून सोन्याचे गंठण व मोबाईल काढून घेतल्या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी तलाठी मच्छिंद्र राहणे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून आरोपीच्या पत्नीचा जामीन अर्ज संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश मंदार नेरलेकर यांनी मंजूर केला आहे.

तक्रारदार महिला अनिता राहाणे यांच्या घरात भाड्याने राहत असताना, मच्छिंद्र राहाणे रात्री अपरात्री त्रास देत असे आणि लज्जास्पद संदेश पाठवत असे, असा आरोप आहे. १ जुलै २०२५ रोजी दुपारी, अनिता राहाणे आणि अन्य ८-९ महिलांनी फिर्यादीला घराबाहेर ओढून मारहाण केली. यावेळी त्यांच्या गळ्यातील २७,००० रुपयांचे सोन्याचे गंठण आणि २५,००० रुपयांचा मोबाईल काढून घेतल्याचा आरोप आहे. फिर्यादीच्या पतीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली.

आरोपींच्यावतीने त्यांच्या वकिलांनी सांगितले की, मच्छिंद्र राहणे हे तलाठी असून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले जात आहे. घटनेच्या वेळी ते कार्यालयात उपस्थित होते. तसेच, फिर्यादीवरही यापूर्वी गुन्हा दाखल केला असल्याचे नमूद केले. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्री. पी. बी. वाघ यांनीही आरोपींच्या जामिनाला विरोध करत सांगितले की, गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, आरोपी फरार आहेत आणि पुराव्यांशी छेडछाड करण्याची शक्यता आहे.

फिर्यादीच्या वकील श्रद्धा राहातेकर यांनी युक्तिवाद केला की, आरोपी मच्छिंद्र हा शासकीय सेवक आहे म्हणजे गुन्हा करणारच नाही असे नाही. त्याच्या पदाचा गैरवापर करून त्याने अटक टाळली आहे. फिर्यादी पक्षाविरुद्ध झालेल्या गुन्ह्याच्या आधारे फिर्यादी पक्षाला लगेच अटक झाली. मोबाईल फोन आणि गंठणाच्या पावत्या दाखल केल्या आहेत. यातील आणखी एक आरोपी पप्पू गोडगे अजूनही समाज माध्यमांवर फिर्यादीची बदनामी करतो. मोबाईलवरील संभाषणाचा पुरावा हस्तगत करणे आवश्यक आहे. पोलिसांनी तक्रार घेण्यास विलंब केला यासाठी फिर्यादीला दोषी ठरवता येणार नाही असेही त्यांनी सांगितले.

न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि कागदपत्रे तपासल्यानंतर निरीक्षण केले की, अनिता राहाणे यांचा गुन्ह्यात केवळ मारहाण आणि शिवीगाळ करण्यापुरता सहभाग दिसतो, त्यांना कोठडीची गरज नसल्याने ४०,००० रुपयांच्या जामीन आणि अटींवर जामीन मंजूर करण्यात आला.

मात्र, मच्छिंद्र राहाणे यांच्यावर लज्जास्पद संदेश पाठवणे आणि रात्री अपरात्री त्रास देण्याचा आरोप असल्याने, त्यांच्याकडून मोबाईल फोन जप्त करणे तपासासाठी महत्त्वाचे आहे, असे न्यायालयाने म्हटले. यामुळे तपासात अडथळा येऊ नये म्हणून मच्छिंद्र राहाणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,092
अटकपूर्व जामीन अर्ज मच्छिंद्र राहणे श्रद्धा राहतेकर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.