Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » १४० वर्षांच्या पेटीट विद्यालयाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा एल्गार: सीए कैलास सोमाणी यांचा पुढाकार
शिक्षण

१४० वर्षांच्या पेटीट विद्यालयाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा एल्गार: सीए कैलास सोमाणी यांचा पुढाकार

अरगडे यांनी सर्व बॅचच्या माजी विद्यार्थ्यांना एकत्रित येऊन शाळेला मदत करण्याचे आणि पेटीट विद्यालयाला त्याचे गतवैभव परत मिळवून देण्याचे आवाहन केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त

संगमनेर, प्रतिनिधी: 

१४० वर्षांपासून अविरतपणे ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या संगमनेर येथील सर डी.एम. पेटीट विद्यालयाला त्याचे गतवैभव परत मिळवून देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी कंबर कसली आहे. उद्योजक आणि चार्टर्ड अकाउंटंट (CA) कैलास सोमाणी यांनी या प्रयत्नांचे नेतृत्व करत, माजी विद्यार्थ्यांकडून यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असा विश्वास व्यक्त केला आहे. माजी विद्यार्थ्यांच्या या एकोप्याने पेटिट विद्यालयाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे.

नुकत्याच आयोजित एका कार्यक्रमात, सर डी.एम. पेटीट विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना विविध शालेय वस्तूंचे वाटप माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. याप्रसंगी मंचावर प्राचार्य चौधरी, माजी प्राचार्य रामनाथ जगताप, श्रीकांत अरगडे, वनम सर, राधेश्याम राठी आदी मान्यवर उपस्थित होते. 

१९८८ च्या दहावीच्या तुकडीतील माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत, शालेय विद्यार्थ्यांना गणवेश, स्कूल बॅग, शूज, वॉटर बॉटल, वह्या-पुस्तके यांसारख्या आवश्यक शालेय साहित्यांचे वाटप केले.

यावेळी बोलताना कैलास सोमाणी यांनी विद्यालयाच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा दिला. ते म्हणाले, “या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य संग्रामापासून ते आजतागायत विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देऊन शाळेचे आणि संगमनेरचे नाव उंचावले आहे.” त्यांनी आपल्या १९८८ च्या तुकडीतील मित्रांचे उदाहरण दिले, ज्यात अनेक जण उद्योग-व्यवसाय आणि नोकरीच्या निमित्ताने विविध ठिकाणी स्थायिक झाले आहेत, तर काही प्रशासकीय सेवेत उच्च पदांवर कार्यरत आहेत. सोमाणी यांनी राधेश्याम राठी यांच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले, त्यांनी व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. 

व्हॉट्सॲपसारख्या तंत्रज्ञानाचा विधायक कार्यासाठी केलेला हा उपयोग अनेकांना प्रेरणादायी आहे, असे सोमाणी म्हणाले. त्यांनी या उपक्रमाला केवळ विद्यार्थ्यांना मदत नसून, शाळेच्या ऋणातून मुक्त होण्याची एक संधी असल्याचे म्हटले आणि दरवर्षी शाळेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

माजी शिक्षक श्रीकांत अरगडे यांनी या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, मी ३५ वर्षे या शाळेत नोकरी केली आहे. मी शाळेचा सुवर्णकाळ पाहिला आहे आणि शाळेचा शताब्दी महोत्सव साजरा करण्याची तसेच शताब्दी विशेषांकाचे संपादन करण्याची संधी मला मिळाली, असे ते म्हणाले. मात्र, सध्या शाळेची झालेली दुरवस्था पाहून वाईट वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

अरगडे यांनी सर्व बॅचच्या माजी विद्यार्थ्यांना एकत्रित येऊन शाळेला मदत करण्याचे आणि पेटीट विद्यालयाला त्याचे गतवैभव परत मिळवून देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राधेश्याम राठी यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विद्यालयाचे शिक्षक वनम सर यांनी केले. माजी विद्यार्थ्यांचा हा एकोप्याचा प्रयत्न निश्चितच पेटीट विद्यालयाच्या भविष्यासाठी एक नवी दिशा देईल आणि हे विद्यालय पुन्हा एकदा ज्ञानदानाच्या क्षेत्रात आपले गतवैभव प्राप्त करेल, अशी अपेक्षा आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,458
कैलास सोमाणी पेटीट विद्यालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम…

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.