Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी सीसीटीव्ही बंधनकारक: पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे निर्देश
बैठक

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी सीसीटीव्ही बंधनकारक: पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे निर्देश

पोलीस अधीक्षक घार्गे यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले असून, या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 25, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, दि. २५ जुलै: 

शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कडक पाऊल उचलले आहे. त्यांनी शालेय बस आणि इतर विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा शालेय बस सुरक्षा समितीच्या बैठकीत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. या महत्त्वाच्या बैठकीला महानगरपालिकेचे उपायुक्त विजय मुंडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे आणि चंद्रकांत खेमनर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक घार्गे यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक शालेय बस किंवा विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित असणे अनिवार्य आहे. तसेच, ६ वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी बस किंवा वाहनांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या सोयीसाठी, शालेय बस आणि वाहनांवर अत्यावश्यक दूरध्वनी क्रमांक स्पष्टपणे लिहिलेले असावेत, असेही त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अवैध वाहतुकीवर अंकुश घालणे महत्त्वाचे असून, संबंधित विभागांनी संयुक्त मोहीम राबवून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तातडीने कारवाई करावी, असे निर्देशही घार्गे यांनी दिले. विद्यार्थ्यांचा चढ-उतार केवळ शाळेच्या पार्किंगमध्येच सुरक्षितपणे होईल याची खात्री करावी, रस्त्यावर धोकादायक पद्धतीने चढ-उतार करणे पूर्णपणे टाळावे असेही सांगण्यात आले.

प्रत्येक शाळेच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी जबाबदार व्यक्तीची नियुक्ती करावी, यावर त्यांनी भर दिला. याशिवाय, सर्व शाळांनी परिवहन समितीच्या बैठका नियमितपणे घेण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. पोलीस अधीक्षक घार्गे यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले असून, या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 683
बैठक सोमनाथ घार्गे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

दंडकारण्य अभियानांतर्गत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करा; वृक्ष संगोपन हीच खरी ईश्वर सेवा: माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे आवाहन

July 14, 2026

नाशिक-पुणे रेल्वे रद्द झाल्याने जनतेत संताप; घारगावच्या बैठकीत राजकारणविरहीत तीव्र जन-आंदोलनाचा निर्धार!

June 29, 2026

अपुऱ्या पावसामुळे पाणी जपून वापरण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आवाहन; ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी निश्चित करण्याचे मंत्री विखे पाटलांचे निर्देश

June 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

By अनंत पांगारकरJuly 15, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खांडगाव शिवारात एका १५ वर्षीय…

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.