Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पतीसोबत नांदण्यास नकार दिल्याने पतीकडून पत्नीची हत्या
गुन्हेगारी

पतीसोबत नांदण्यास नकार दिल्याने पतीकडून पत्नीची हत्या

ममता जाधव यांना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त – पुणे: 

दारूचे व्यसन सोडण्यास नकार देणाऱ्या पतीसोबत नांदण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील लोहगाव परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी पती प्रेम जाधव (वय २७) याला अटक करण्यात आली आहे. ममता जाधव (वय २१) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी रेश्मा राठोड यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत ममता जाधव आणि आरोपी प्रेम जाधव यांचा विवाह २०२० मध्ये झाला होता. प्रेम जाधव याला दारूचे व्यसन होते. ममता वारंवार दारू सोडण्याची विनंती करत होती, परंतु प्रेम दारू सोडत नव्हता. याच कारणावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ममता तिच्या कुटुंबीयांसोबत लोहगाव येथे राहत होती.

पत्नीने नांदायला यावे म्हणून प्रेम जाधव अनेक वेळा तिच्याशी संपर्क साधत होता. ‘तुम्ही दारू सोडली तरच मी नांदायला येईन,’ असे ममता प्रत्येक वेळी त्याला सांगत असे. याच दरम्यान, काल रविवारी दुपारी प्रेम जाधव ममताला भेटण्यासाठी लोहगाव येथील तिच्या घरी गेला. त्याने ममताला नांदायला चल असे सांगितले असता, पुन्हा दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणात संतप्त झालेल्या प्रेम जाधवने पत्नी ममताच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले.

घराबाहेर बसलेल्या फिर्यादी रेश्मा राठोड यांना आरडाओरड ऐकू आल्याने त्यांनी घरात जाऊन पाहिले असता, आरोपी प्रेम जाधव पत्नीवर चाकूने वार करत असल्याचे दिसले. रेश्मा राठोड यांनी आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला असता, प्रेमने त्यांच्या हातावरही चाकूने वार करून घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर ममता जाधव यांना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेतील आरोपी प्रेम जाधव याला काही तासांतच अटक करण्यात आल्याची माहिती विमानतळ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक नितीन राठोड यांनी दिली आहे. या घटनेने लोहगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,188
गुन्हेगारी हत्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेला…

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.