Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लाचखोर मुख्य पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात, पावणे दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
गुन्हेगारी

लाचखोर मुख्य पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात, पावणे दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

तक्रारदारांच्या दोन्ही गॅस एजन्सींवरील कारवाई टाळण्यासाठी दरमहा २,५०,००० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/07/2025Updated:30/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई: नियंत्रक शिधा वाटप व संचालक कार्यालयातील मुख्य निरीक्षण अधिकारी विनायक वसंत निकम याला गॅस एजन्सी चालकाकडून १ लाख ७५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) काल, (२९ जुलै) रंगेहाथ पकडले. निकमने मासिक ‘हफ्ता’ म्हणून ही रक्कम मागितली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कांदिवली येथील एका गॅस एजन्सीमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांच्या नातेवाईकांची ठाण्यात गॅस एजन्सी आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये निकमने तक्रारदारांच्या गॅस एजन्सीवर, तर ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांच्या नातेवाईकांच्या ठाणे येथील गॅस एजन्सीवर कारवाई केली होती.

१६ जुलै २०२५ रोजी निकमने तक्रारदारांना कार्यालयात बोलावले. १७ जुलै रोजी झालेल्या भेटीत निकमने तक्रारदारांच्या गॅस एजन्सीवर पुढील कारवाई न करण्यासाठी दरमहा १,५०,००० रुपये आणि त्यांच्या नातेवाईकांच्या एजन्सीसाठी १,००,००० रुपये, असे एकूण दरमहा २,५०,००० रुपयांची लाच मागितली.

तक्रारदारांनी इतकी मोठी रक्कम देण्यास असमर्थता व्यक्त केल्यानंतर, निकमने साहेबांशी बोलून घेतो असे सांगितले. १८ जुलै रोजी निकमने पुन्हा संपर्क साधून साहेबांशी बोलणे झाले आहे, भेटायला या असे सांगितले. मात्र, तक्रारदारांची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे, त्यांनी २५ जुलैला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी, मुंबई येथे तक्रार दाखल केली.

एसीबीने २५ जुलै रोजी केलेल्या पडताळणीत विनायक निकमने तक्रारदारांच्या दोन्ही गॅस एजन्सींवरील कारवाई टाळण्यासाठी दरमहा २,५०,००० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीअंती, त्याने तक्रारदारांच्या एजन्सीसाठी १,००,००० रुपये आणि नातेवाईकांच्या एजन्सीसाठी ७५,००० रुपये, असे एकूण १,७५,००० रुपयांचा मासिक ‘हफ्ता’ स्वीकारण्याचे मान्य केले.

या माहितीच्या आधारे, २९ जुलै २०२५ रोजी एसीबीने सापळा रचून विनायक वसंत निकम याला तक्रारदाराकडून १,७५,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती सुनिता दिघे आणि त्यांच्या पथकाने केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,147
लाचखोरी लाचलुचपत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेला…

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.