Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सरकारी जमिनीवरील २०११ पर्यंतची अतिक्रमणे होणार नियमित: ३० लाख कुटुंबांना लाभ
राजकारण

सरकारी जमिनीवरील २०११ पर्यंतची अतिक्रमणे होणार नियमित: ३० लाख कुटुंबांना लाभ

या विशेष मोहिमेअंतर्गत ५०० चौरस फुटांपर्यंतची निवासी अतिक्रमणे विनामूल्य नियमित केली जातील, तर उर्वरित अतिक्रमणांवर बाजारमूल्यानुसार दंड आकारून ती नियमित केली जातील.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त

मुंबई, विशेष प्रतिनिधी:

राज्यातील २०११ पर्यंतची सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे सुमारे ३० लाख अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा मिळेल. या विशेष मोहिमेअंतर्गत ५०० चौरस फुटांपर्यंतची निवासी अतिक्रमणे विनामूल्य नियमित केली जातील, तर उर्वरित अतिक्रमणांवर बाजारमूल्यानुसार दंड आकारून ती नियमित केली जातील. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी ही घोषणा केली.

पंतप्रधान आवास योजनेला गती आणि मालकी हक्काचे स्वप्न पूर्ण- या निर्णयामागे पंतप्रधान आवास योजनेतील ३० लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मुख्य हेतू आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी घराची मालकी असणे बंधनकारक आहे. अतिक्रमणे नियमित झाल्याने संबंधित व्यक्तींच्या नावावर जमीन होईल आणि त्यांना नवीन घरे बांधणे शक्य होईल. २०१८ मध्येही हा निर्णय घेण्यात आला होता, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. आता बांधकामे नियमित झाल्यामुळे या जमीनधारकांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांना महसूल आणि धोरणात सुधारणा- राज्यात जिल्हाधिकारी अधिपत्याखालील जमिनी, वनजमिनी, गायरान जमिनी आणि झुडपी जंगले यांसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे आहेत. ही अतिक्रमणे नियमित करून स्थानिक स्वराज्य संस्थांना मालमत्ता कराच्या माध्यमातून महसूल मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या धोरणांतर्गत ग्रामीण भागातील तसेच मध्यम आणि छोट्या शहरांतील शासकीय जमिनींवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या धोरणात सुधारणा करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या खाजगी जमिनीवरील अतिक्रमणधारकांना पट्टेवाटप करण्यासंदर्भातही कार्यप्रणाली निश्चित करण्यात आल्याचे महसूलमंत्र्यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयातील पुनर्विचार याचिका आणि प्रक्रिया- गायरान आणि झुडपी जंगलांच्या जागेवरील १९९६ पूर्वीच्या बांधकामांना सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिले आहे. मात्र, राज्य सरकारने २०११ पूर्वीच्या बांधकामांना संरक्षित करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

अतिक्रमण नियमितीकरणाची प्रक्रिया- या मोहिमेअंतर्गत, ग्रामीण भागातील ग्रामसेवक आणि तलाठी २०११ पूर्वीच्या अतिक्रमणधारकांची यादी तयार करतील किंवा तिचे पुनर्विलोकन करतील. सरकारी जमिनी आणि वनविभागांच्या जमिनीवरील अतिक्रमणे असे वर्गीकरण करून सर्व अतिक्रमणधारकांना नियमानुकूल करण्याकरिता अर्ज सादर करण्यास सांगण्यात येईल. या अर्जांची पंचायत समिती स्तरावर छाननी केली जाईल. त्यानंतर, उपविभागीय अधिकारी यांच्या अधिपत्याखालील समितीच्या मंजुरीनंतर पात्र आणि शिफारस केलेले प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीच्या मंजुरीसाठी सादर केले जातील. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना पट्टेवाटप करण्यात येणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 300
अतिक्रमण चंद्रशेखर बावनकुळे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याच्या अत्यंत गंभीर आरोपाखाली गेली…

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.