Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वडझरीला भोजापुर चारीचे पाणी मिळाले नाही तर तीन ऑगस्टला रास्तारोको आंदोलन! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षासह ग्रामस्थांचा इशारा; ग्रामपंचायतचा ठराव
पाण्याचे राजकारण

वडझरीला भोजापुर चारीचे पाणी मिळाले नाही तर तीन ऑगस्टला रास्तारोको आंदोलन! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षासह ग्रामस्थांचा इशारा; ग्रामपंचायतचा ठराव

आमचे राजकारण फक्त पाण्यासाठी आहे, आम्हाला इतर कुठलीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/07/2025Updated:31/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त

संगमनेर, प्रतिनिधी:

भोजापूर चारीचे पाणी वडझरी गावातील बंधारे भरण्यासाठी न सोडल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी येत्या ३ ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षासह ग्रामस्थांनी यासंदर्भात पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिले असून, ग्रामपंचायतीनेही याबाबत ठराव केला आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, वडझरी गावातील शेतकरी गेल्या ४० वर्षांपासून निळवंडे व भोजापूरच्या पाण्यापासून वंचित आहेत. भोजापूर चारीचे पाणी नियमानुसार टेलपासून म्हणजे वडझरी गावातील बंधारे भरण्यासाठी अपेक्षित असताना, जलसंपदा विभागाची यंत्रणा काही विशिष्ट लोकांच्या दबावाखाली चुकीचे काम करत आहे. हे पाणी आडमार्गे इतरत्र वळवले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

वडझरी ते गोगलगावपर्यंत जुन्या काळात चारी तयार झालेली असून, ती जलसंपदा खात्याकडेच वर्ग आहे. तिगाव माथ्यापासून वडझरीपर्यंत चारी उपलब्ध असून, थोडी डागडुजी केल्यास हक्काचे पाणी बंधाऱ्यांमध्ये येईल. मात्र, वडझरीला जाणूनबुजून वगळण्यासाठी काही राजकारणी प्रयत्न करत असून, अधिकाऱ्यांनाही चुकीचे काम करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या प्रकरणात मोठे राजकारण होत असून, ज्यांचा खऱ्या अर्थाने पाण्यासाठी सातत्याने संघर्ष आहे, अशा गावांना जाणूनबुजून वंचित ठेवले जात आहे. ज्यांचा चारीच्या पाण्याशी संबंध नाही, असे लोक श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही निवेदनात केला आहे.

ग्रामस्थांनी आपल्या निवेदनात, “आमचे राजकारण फक्त पाण्यासाठी आहे, आम्हाला इतर कुठलीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही,” असे स्पष्ट केले आहे. जलसंपदा खाते आपल्याकडे असल्याने, पालकमंत्र्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून वडझरी बंधाऱ्यात पाणी सोडून जलपूजन करावे आणि संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा, ३ ऑगस्ट रोजी वडझरीमध्ये तळेगाव-लोणी रस्त्यावर बायका-मुलांसह जनावरे व अवजारे घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 621
भोजापुर चारी राजकारण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरसकट कर्जमाफीची आग्रही मागणी

26/09/2026

संगमनेरचा दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश; आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश

26/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याच्या अत्यंत गंभीर आरोपाखाली गेली…

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.