Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पराभवाने खचू नका, कठोर भूमिका घ्या; आगामी निवडणुकात विजय आपलाच: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वाढविला कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास
राजकारण

पराभवाने खचू नका, कठोर भूमिका घ्या; आगामी निवडणुकात विजय आपलाच: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वाढविला कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास

गेल्या अनेक वर्षांपासून आपण या मतदारसंघात काम करत आहोत. जनतेने आपल्याला नेहमीच प्रेम दिले आहे. त्यामुळे या पराभवाचे आत्मपरीक्षण करून आपल्याला पुढे जायचे आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/08/2025Updated:08/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर, प्रतिनिधी: 

काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला असला तरी कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. पुढील काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपलाच विजय होणार आहे त्यामुळे, गोंधळलेल्या अवस्थेत न राहता रोखठोक भूमिका घ्यावी ऐनवेळी भूमिका बदलू नये, पराभवानंतरही अधिक जोमाने काम करण्याची गरज असल्याचं सांगत जनतेच्या प्रश्नांवर कठोर आणि ठाम भूमिका घेऊन पुढील काळात अधिक ताकदीने काम करण्याचे आवाहन माजी मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.  

विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागलेल्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना पराभवाने खचून न जाण्याचा सल्ला देतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी झालेल्या एका बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

या बैठकीला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, शरयू देशमुख, आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे, माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, दिलीप पुंड, सोमेश्वर दिवटे, जावेद पठाण, किशोर टोकसे, निखिल पापडेजा यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोरात म्हणाले, येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच पुढील आव्हानांसाठी सज्ज राहावे, निवडणुकीत झालेला पराभव हा आपल्या कामाचा शेवट नाही. हा एक धडा आहे. या धड्यातून आपण शिकून पुढे जायचे आहे. जनतेची सेवा करणे हेच आपले मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे कुठेही अन्याय होत असेल, तर तो दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.

यावेळी, थोरात यांनी निवडणुकीतील पराभवामागची कारणे आणि भविष्यातील वाटचाल यावर सविस्तर चर्चा केली. त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून आपण या मतदारसंघात काम करत आहोत. जनतेने आपल्याला नेहमीच प्रेम दिले आहे. त्यामुळे या पराभवाचे आत्मपरीक्षण करून आपल्याला पुढे जायचे आहे.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, या पराभवाने आपण निराश होण्याचे कारण नाही. पुढील काळात आपल्याला कठोर भूमिका घेऊन जनतेची सेवा करावी लागेल. आगामी निवडणुकांमध्ये आपला विजय निश्चित आहे. थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,087
बाळासाहेब थोरात बैठक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.