Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेनेचा भगवा फडकणार; शिवसेना शाखेच्या माध्यमातून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवा – आमदार खताळ यांचे आवाहन
राजकारण

संगमनेरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेनेचा भगवा फडकणार; शिवसेना शाखेच्या माध्यमातून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवा – आमदार खताळ यांचे आवाहन

शिवसेना शाखेत मांडले जाणारे प्रश्न तिथे सुटले नाहीत, तर ते माझ्या जनसंपर्क कार्यालयात घेऊन या. तिथे मी ते सोडवेन.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर, प्रतिनिधी: आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. निवडणुका ईव्हीएमवर असोत किंवा बॅलेट पेपरवर, जनता पुन्हा एकदा विरोधकांना घरी बसवेल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.

संगमनेर येथील कुंभार गल्लीमध्ये शिवसेना शाखेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार खताळ यांनी कार्यकर्त्यांना सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलं. यावेळी शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खताळ म्हणाले, शिवसेना पक्षात कार्यकर्ता हे पद सर्वात महत्त्वाचे आहे. मी या मतदारसंघाचा आमदार असलो तरी, सर्वप्रथम एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी कार्यकर्ता म्हणूनच काम करावे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही शिकवण दिली. त्याच विचारधारेवर आपण काम करत आहोत. शिवसैनिकांनी केवळ पद घेऊन मिरवू नये, तर गोरगरीब, कष्टकरी आणि वंचितांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत.

शिवसेना शाखेत मांडले जाणारे प्रश्न तिथे सुटले नाहीत, तर ते माझ्या जनसंपर्क कार्यालयात घेऊन या. तिथे मी ते सोडवेन. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी सामान्य शिवसैनिकांना सन्मान देण्याची जी परंपरा सुरू केली होती, ती पुढे चालू ठेवण्यावरही त्यांनी भर दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेना पुन्हा वाढत आहे. आपल्याला सर्वांना सोबत घेऊन पक्षाचे काम वाढवायचे आहे. कार्यकर्त्यांनी एकमेकांमध्ये समन्वय राखून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेनेचे उपशहर प्रमुख अजित जाधव यांनी केले. कुंभारगल्ली शाखाप्रमुख लाला दायमा यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 583
अमोल खताळ शिवसेना शाखा उद्घाटन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

By Annant Ppangarkar21/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडिया हे आजच्या माहितीच्या युगात अत्यंत प्रभावी माध्यम बनले…

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.