Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » हिवरगाव पावसा ३३ केव्ही वीजवाहिनीचा शुभारंभ, भविष्यात सौरऊर्जा प्रकल्प उभारणार; गरज पडल्यास गैरव्यवहार प्रकरणी आंदोलन करू- आमदार खताळ
राजकारण

हिवरगाव पावसा ३३ केव्ही वीजवाहिनीचा शुभारंभ, भविष्यात सौरऊर्जा प्रकल्प उभारणार; गरज पडल्यास गैरव्यवहार प्रकरणी आंदोलन करू- आमदार खताळ

हिवरगाव पावसा येथील खंडोबा देवस्थानसाठी आतापर्यंत मोठा निधी दिला असल्याचे आमदार खताळ यांनी नमूद केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर, प्रतिनिधी: हिवरगाव पावसा येथील ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करून दिल्यास या ठिकाणी भविष्यात मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येईल. खंडोबा देवस्थानात झालेल्या कथित ११ लाख रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. गरज पडल्यास आपण स्वतः मंदिराबाहेर आंदोलन करू, असे प्रतिपादन संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी केले.

घारगाव ते हिवरगाव पावसा या ३३ केव्ही उच्चदाब वीजवाहिनीचा नुकताच शुभारंभ खताळ यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. हिवरगाव पावसा येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुभाष गडाख होते. यावेळी भाजपचे उपाध्यक्ष अशोक कानवडे, माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, उपसरपंच सुजाता दवंगे, शिवसेना अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोमनाथ भालेराव, केशव दवंगे, बाळासाहेब शेटे यांच्यासह अनेक मान्यवर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार खताळ यांनी सांगितले की, या नवीन वीजवाहिनीमुळे हिवरगाव पावसा, सावरगाव, रायतावाडी, झोळे, देवगाव, शिरापूर, निमगाव, टेंभी, पिंपळगाव माथा, खांडगाव या गावांना पूर्ण दाबाने वीज मिळेल. तसेच, पद्मनगर भागातील वीज उपकेंद्रावरील भार कमी होण्यासही मदत होईल. या भागातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल, याव्यतिरिक्त, त्यांनी विकासकामांच्या नावाखाली झालेला भ्रष्टाचार उघड करण्याचाही निर्धार व्यक्त केला.

प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिवरगाव पावसा येथील खंडोबा देवस्थानसाठी आतापर्यंत मोठा निधी दिला असल्याचे आमदार खताळ यांनी नमूद केले. हे मंदिर ‘क’ दर्जातून ‘ब’ दर्जा देण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहे, तो लवकरच मंजूर होऊन मंदिराच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होईल.

याचबरोबर, त्यांनी तमाशा कलावंत पवळाबाई हिवरगावकर यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश दवंगे यांनी केले, तर आभार सोमनाथ भालेराव यांनी मानले.

अडचणींवर मात करून योजना मार्गी- महावितरणचे उपकार्यकारी अभियंता धनंजय खैरनार यांनी सांगितले की, या वीजवाहिनीच्या कामात अनेक अडचणी आल्या. मात्र आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांमुळे त्या दूर झाल्या. या वीजवाहिनीमुळे सावरगाव तळ, पिंपळगाव माता, रायतेवाडी, देवगाव या भागांतील शेतकऱ्यांचा फायदा होईल. काही कामे मार्गी लागली असून, उर्वरित कामे चार-पाच महिन्यांत पूर्ण होऊन उपकेंद्र कार्यान्वित होईल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 408
अमोल खताळ वीज वाहिनी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

By Annant Ppangarkar21/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडिया हे आजच्या माहितीच्या युगात अत्यंत प्रभावी माध्यम बनले…

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.