Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुनानकांचे विचार : मानवतेचा प्रकाश आणि समतेचा महामंत्र!

24/11/2026

ऐतिहासिक वारशाचे संवर्धन ही काळाची गरज; धर्मवीर गडाच्या इतिहासाचे जतन नव्या पिढीसाठी महत्त्वाचे : काजल जंजिरे

24/11/2026

कवी अनंत फंदी नाट्यगृहाच्या लोकार्पणाने संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर; हे तालुकास्तरावरील राज्यातील सर्वात अद्यावत नाट्यगृह असल्याचे प्रशांत दामले यांचे गौरवोद्गार

24/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पद्मशाली महिला संघमच्या अध्यक्षपदी लक्ष्मी इटप
यश / निवड / पुरस्कार

पद्मशाली महिला संघमच्या अध्यक्षपदी लक्ष्मी इटप

पद्मशाली महिलांच्या कष्टामुळे आज समाज प्रगतशील - निलम खताळ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर, प्रतिनिधी: पद्मशाली महिला संघमच्या अध्यक्षपदी लक्ष्मी दत्तात्रय इटप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. येथील मार्कंडेय मंदिरात आयोजित महिला मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपाध्यक्षपदी वनिता शांताराम आडेप, साईसुधा विलास वनम, सेक्रेटरीपदी गिता शंकर अन्नलदास, रोहिणी भारत शंकरपल्ली, तर खजिनदारपदी वैशाली अंबादास आडेप यांची निवड करण्यात आली. 

त्याचबरोबर शितल सुनिल मादास, तुळजा राजेंद्र श्रीराम, सुरेखा शंकर चन्ना, देविका लिंगमुर्ती चिंता, रेखा गणेश मादास, सुनिता सतिश आडेप, वनिता नारायण इटप, वैशाली काशिनाथ आडेप, मिनाक्षी अजय श्रीपतवाड, आशा विनय राम, इंदिरा विलास श्रीराम, पुनम सागर शिरसुल्ला, स्वाती संतोष अंकारम, स्मिता विनोद झुंजुर, वैशाली गणेश पगडाल, दिपाली सुधाकर आडेप, रूपाली व्यंकटेश वनम यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.

तसेच पदमशाली समाज विश्वस्त मंडळाच्या महिला सदस्यपदी कविता पापय्या शिरसुल्ला, ज्योती नरेंद्र दुस्सा यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व महिला सदस्यांचे आजी माजी महिला सदस्यांनी अभिनंदन केले. यावेळी पद्मशाली समाज विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष गणेश मादास यांनी नुतन अध्यक्षांचे व महिला मंडळांचे अभिनंदन करित पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

पद्मशाली महिलांच्या कष्टामुळे आज समाज प्रगतशील – निलम खताळ 

पद्मशाली समाजातील महिला या अत्यंत कष्टाळू आणि चिकाटी वृत्तीच्या आहेत. हातमाग, विडीकाम करत आपल्या संसाराचा गाडा त्यांनी हाकला. त्यातून त्यांनी मुलांना शिक्षणाचा वारसा दिला. त्यांच्या कष्टाचे फळ म्हणून आजची तरुण पिढी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना दिसत आहे. त्यामुळे पद्मशाली समाजाची खरी ताकद या महिला आहेत, असे उद्गार आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलम खताळ यांनी काढले.

खताळ यांनी पद्मशाली समाज मंडळाच्या नुतन महिला अध्यक्ष लक्ष्मी इटप यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, माजी नगरसेविका ज्योती भोर, कांचन ढोरे, दक्षिण भारतीय आघाडी प्रमुख पांडूरंग शेराल यांच्यासह महिला सदस्य उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 660
निवड पद्मशाली समाज लक्ष्मी इटप
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

इरफानभाई मन्सुरी यांची भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हा सचिवपदी नियुक्ती

25/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी साई दिघे, तर उपाध्यक्षपदी निलेश शिंदे यांची एकमताने निवड

20/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
विशेष लेख

गुरुनानकांचे विचार : मानवतेचा प्रकाश आणि समतेचा महामंत्र!

By Annant Ppangarkar24/11/20260

मानवाच्या इतिहासात काही महापुरुष असे होऊन गेले, ज्यांनी केवळ धर्माची शिकवण दिली नाही, तर माणसाला…

ऐतिहासिक वारशाचे संवर्धन ही काळाची गरज; धर्मवीर गडाच्या इतिहासाचे जतन नव्या पिढीसाठी महत्त्वाचे : काजल जंजिरे

24/11/2026

कवी अनंत फंदी नाट्यगृहाच्या लोकार्पणाने संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर; हे तालुकास्तरावरील राज्यातील सर्वात अद्यावत नाट्यगृह असल्याचे प्रशांत दामले यांचे गौरवोद्गार

24/11/2026

लग्नाचे आमिष दाखवून १२ ते १५ वर्षे बळजबरीने अत्याचार; शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यासह दोघा डॉक्टरांवर गुन्हा

24/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.