Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

धर्माची ग्लानी सर्वप्रथम माणसाच्या अंतःकरणात होते : डॉ. संजय मालपाणी; संगमनेरमध्ये नृत्यवंदनेने ‘मनशांती व जीवनविकास व्याख्यानमाले’चा समारोप

26/08/2026

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांना लुटणारी टोळी जेरबंद; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन गुन्ह्यांचा उलगडा

26/08/2026

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेला मिळाले हे आंतरराष्ट्रीय मानांकन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कॉर्पोरेट ट्रेनिंग हॉलचे उद्घाटन

26/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ मार्गानेच व्हावा; आमदार सत्यजीत तांबे यांनी पुन्हा केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना दिले स्मरणपत्र
महाराष्ट्र संवाद विशेष

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ मार्गानेच व्हावा; आमदार सत्यजीत तांबे यांनी पुन्हा केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना दिले स्मरणपत्र

तांबे यांनी केंद्र सरकारला मूळ मार्ग कायम ठेवण्याचा निर्णय घ्यावा व प्रकल्प ‘महा रेल’ मार्फत तातडीने राबवावा अशी मागणी केली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर, प्रतिनिधी: नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा महाराष्ट्राच्या प्रादेशिक तसेच राष्ट्रीय विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा उपक्रम आहे. या प्रकल्पाचा मूळ मंजूर मार्ग कायम ठेवण्याची तातडीची गरज असल्याचे सांगत आमदार सत्यजीत तांबे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना स्मरणपत्र दिले आहे. 

या पत्रात आमदार तांबे यांनी स्पष्ट केले आहे की मूळ मार्गानुसार नाशिक – पुणे या दरम्यान सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव व राजगुरुनगर अशा भागातून जातो. या सर्व भागांना औद्योगिक व आर्थिक विकासाची संधी मिळावी यासाठीच मूळ मार्ग निश्चित करण्यात आला होता. परंतु सध्या प्रकल्पाचा मार्ग शिर्डीकडे वळविण्याचा विचार सुरू असून त्यामुळे हा भाग वंचित राहील.

तसेच मूळ मार्गासाठी सुमारे २५ ते ३० टक्के जमीन संपादन पूर्ण झाले असून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईही देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत मार्ग बदलल्यास मोठा विलंब होईल तसेच स्थानिक शेतकरी व नागरिकांचा देखील विरोध वाढेल.

दि. ९ जुलै २०२४ रोजी झालेल्या बैठकीतही हा विषय उपस्थित करण्यात आला होता असे पत्रात नमूद करून तांबे यांनी केंद्र सरकारला मूळ मार्ग कायम ठेवण्याचा निर्णय घ्यावा व प्रकल्प ‘महा रेल’ मार्फत तातडीने राबवावा अशी मागणी केली आहे.

या निर्णयामुळे ग्रामीण भागातील रोजगारनिर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना, शहरी गर्दी कमी होणे व संतुलित प्रादेशिक विकास साधता येईल असा ठाम विश्वासही आमदार तांबे यांनी व्यक्त केला.

या रेल्वे मार्गासाठी तांबे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा

* तांबे यांनी वेळोवेळी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करून मूळ मार्ग कायम ठेवण्याची मागणी केली.

* सतत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या संपर्कात राहून नाशिक – पुणे रेल्वेमार्ग संगमनेरमार्गेच ( मूळ मार्गेच) व्हावा यासाठी आग्रही मागणी ठेवली.

* पत्रकार परिषदेतून मार्ग बदलाविरोधात तीव्र भूमिका.

* सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करून सर्व आमदारांचा पाठींबा घेतला.

* केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना सविस्तर पत्र देत मूळ मार्गावरच प्रकल्प राबवावा, असा ठाम आग्रह धरला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 906
नाशिक पुणे रेल्वे सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026

‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी’ हे नैराश्यावरील प्रभावी औषध; संगमनेरमध्ये व्याख्यानमालेचा उत्साहात शुभारंभ

23/08/2026

शिक्षित वस्तीच्या मध्यभागी अंधश्रद्धेचा अघोरी खेळ: संगमनेरमधील घुलेवाडीत तांत्रिक प्रकारांमुळे खळबळ, सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

22/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
व्याख्यान

धर्माची ग्लानी सर्वप्रथम माणसाच्या अंतःकरणात होते : डॉ. संजय मालपाणी; संगमनेरमध्ये नृत्यवंदनेने ‘मनशांती व जीवनविकास व्याख्यानमाले’चा समारोप

By Annant Ppangarkar26/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: कर्म करणे ही जीवनाची अपरिहार्यता आहे; मात्र त्या…

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांना लुटणारी टोळी जेरबंद; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन गुन्ह्यांचा उलगडा

26/08/2026

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेला मिळाले हे आंतरराष्ट्रीय मानांकन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कॉर्पोरेट ट्रेनिंग हॉलचे उद्घाटन

26/08/2026

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.