Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मालपाणी उद्योग समूहाची ११ वर्षांपासून खंडित झालेली गणेश विसर्जन मिरवणूक पुन्हा सुरू; संगमनेरात उत्साहाचे वातावरण
धार्मिक

मालपाणी उद्योग समूहाची ११ वर्षांपासून खंडित झालेली गणेश विसर्जन मिरवणूक पुन्हा सुरू; संगमनेरात उत्साहाचे वातावरण

मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी यांनी या संदर्भात माहिती दिली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहमदनगर जिल्ह्यात आकर्षणाचे केंद्र; संत ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन सोहळा आणि महादेवाचा देखावा ठरणार मुख्य आकर्षण

संगमनेर – 

गेल्या 11 वर्षांपासून खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरु करत, यंदा मालपाणी उद्योग समूहाच्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही मिरवणूक अधिक भव्य आणि शाही असणार असून त्यात विविध प्रकारच्या 22 पथकांचा समावेश करण्यात आला आहे. ही मिरवणूक मंगळवारी (२ सप्टेंबर) सकाळी साडेदहा वाजता मालपाणी लॉन्स येथून सुरु होणार आहे.

मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी यांनी या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, काही कारणांमुळे गेल्या एक दशकाहून अधिक काळ ही मिरवणूक काढली नव्हती. परंतु यंदा पुन्हा एकदा जुनी परंपरा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मिरवणूक संगमनेरकरांसाठी एक पर्वणी ठरणार असून, त्यात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी आणि महादेवाचा जिवंत देखावा ही प्रमुख आकर्षणे असतील.

सकाळी साडेदहा वाजता कॉलेज रस्त्यावरील मालपाणी लॉन्स येथून मिरवणुकीला सुरुवात होईल. बजाज दुचाकी दालनासमोर मालपाणी परिवाराच्या वतीने गणरायाची पूजा केली जाईल. त्यानंतर ही मिरवणूक महामार्गावरुन बसस्थानक, नवघरगल्ली, गवंडीपुरा मशीद, मेनरोड मार्गे मालपाणी विद्यालयाजवळ समाप्त होईल.

या मिरवणुकीत उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांनी तयार केलेले ढोल-ताशा पथक, पारंपरिक झांजरी, लेझीम आणि विविध लोकनृत्ये सादर केली जातील. तसेच, महाबली हनुमानाच्या भव्य मूर्तीसमोर ‘रामजी की निकली सवारी’ या गाण्यावर नृत्य सादर होणार आहे. शिर्डी वॉटरपार्कचे ॲक्रोबॅट्स आणि साईतीर्थ पार्कची साईपालखी मिरवणुकीची शोभा वाढवतील. यंदाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचा जिवंत देखावा आणि त्याचबरोबर महादेवाचा आकर्षक देखावा असणार आहे. मिरवणुकीच्या शेवटी, सजवलेल्या रथात श्री गणेशाची शाही स्वारी निघेल, ज्याच्या पुढे ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करणारी भजनी मंडळी सहभागी असतील.

सन 1949 पासून मालपाणी उद्योग समूहात गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. तेव्हापासून कामगार आणि कर्मचारी मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करतात. सुरुवातीला गणेश स्थापनेच्या दिवशी मिरवणूक निघायची, मात्र नंतर सातव्या दिवशी विसर्जन मिरवणूक काढण्याची प्रथा सुरू झाली. गेली 76 वर्षे ही परंपरा अखंडित असली, तरी 11 वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीला खंड पडला होता. यंदा पुन्हा एकदा ती परंपरा सुरु झाल्याने संगमनेरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे.

मालपाणी उद्योग समूहाने शहरातील नागरिकांना या शाही सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,544
गणेश विसर्जन मिरवणूक गणेशोत्सव मालपाणी उद्योग समूह
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

आश्वी पोलिसांच्या दडपशाहीने विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न; गणेश मंडळांचा संताप, चौकशीची मागणी

26/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.