Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगर एलसीबीची मोठी कारवाई: ओडिसातून तस्करी करून आणलेला ८० लाखांचा गांजा जप्त
गुन्हेगारी

अहिल्यानगर एलसीबीची मोठी कारवाई: ओडिसातून तस्करी करून आणलेला ८० लाखांचा गांजा जप्त

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६५० / २०२५ गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) ii (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर – 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ओडिशा राज्यातून तस्करी करून आणलेला तब्बल १२० किलो ९०५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. वडगाव गुप्ता परिसरात केलेल्या या कारवाईत पोलिसांनी गांजासह एकूण ८० लाख ८३ हजार ४६४ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून दोघांना अटक केली आहे.

पोलिसांना गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशा राज्यातून गांजाची मोठी खेप अहिल्यानगरमध्ये विक्रीसाठी आणली जात होती. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. शेंडी बायपास ते एम.आय.डी.सी. रोडवर वडगाव गुप्ता गावाजवळ हॉटेल किनाराजवळ पोलिसांनी एक संशयित ट्रक (एम.एच. १४ जी. यु. २१११) थांबवला.

यावेळी ट्रकची तपासणी केली असता, त्यात नवनाथ अंबादास मेटे (वय ३८, रा. श्रीगोंदा) आणि ज्ञानेश्वर दत्तात्रय फुंदे (वय ३१, रा. शेवगाव) हे दोघे आढळून आले. ट्रकच्या केबिनवरील टपावर ६ गोण्यांमध्ये १२० किलो ९०५ ग्रॅम गांजा लपवलेला होता. याची किंमत ३० लाख २२ हजार ६२५ रुपये आहे. गांजासह ट्रक आणि इतर साहित्य असा एकूण ८० लाख ८३ हजार ४६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश लोंढे, संतोष खैरे, दिपक घाटकर, फुरकान शेख, लक्ष्मण खोकले, राहुल द्वारके, अमृत आढाव, आकाश काळे, रमिझराजा आतार, प्रकाश मांडगे, सागर ससाणे, भगवान धुळे, उमाकांत गावडे, अरुण मोरे, जयराम जंगले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींविरोधात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६५० / २०२५ गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) ii (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अनंत सालगुडे करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 658
अहिल्यानगर एलसीबी कारवाई गांजा गांजा तस्करी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शेतकी सहकारी संघ ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची…

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.