Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही अग्रस्थानी : बाळासाहेब थोरात
शेती व सहकार

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही अग्रस्थानी : बाळासाहेब थोरात

बाजार समितीने शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा पुरवल्या आहेत. वडगाव पान, साकुर, आंबी दुमाला आणि निमोन येथे उपबाजार सुरू करून आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – 

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी राज्यात एक अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलेली बाजार समितीची ही संकल्पना संगमनेरमध्ये यशस्वीरित्या राबवली गेली, यामुळे ती जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आणि राज्यातही सर्वात पुढे असल्याचे प्रतिपादन काँग्रेसची ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

ते बाजार समितीच्या 21 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. या सभेला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, पांडुरंग घुले आदी मान्यवर उपस्थित होते. 

थोरात म्हणाले, बाजार समितीने शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा पुरवल्या आहेत. वडगाव पान, साकुर, आंबी दुमाला आणि निमोन येथे उपबाजार सुरू करून आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध असल्याने या बाजार समिती शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विकावा. मागील वर्षी केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द झाले नसते, तर बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात आले असते. यामुळे बाजार समित्यांचे महत्त्व अधोरेखित होते.

डॉ. सुधीर तांबे यांनी शेतकऱ्यांना देशाचा आत्मा संबोधून त्यांच्या मालाला हमीभाव मिळणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. अनेक बाजार समित्या अडचणीत असताना, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर बाजार समितीने नाशिक विभागात आणि जिल्ह्यात आपले पहिले स्थान कायम राखले आहे, असे त्यांनी गौरवपूर्ण उद्गार काढले.

बाजार समितीचे अध्यक्ष शंकर पाटील खेमनर यांनी समितीच्या विकासकामांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, वडगाव पान येथे 16 एकर जागेत 1000 टन क्षमतेचे गोडाऊन बांधले जात आहे, जिथे शेतमालाच्या तारणावर कर्ज देण्याची सोय केली गेली आहे. आंबी खालसा येथे 15 एकर आणि निमोन येथे 2 एकर जागेत कांदा मार्केट सुरू केले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल किमान 200 रुपयांचा फायदा होत आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांचा पगार सरकारने करावा, अशी मागणीही केली. बाजार समितीने अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा वापर सुरू केला असून, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाच्या बाजारभावाबाबतची माहिती तातडीने मिळते.

लक्ष्मणराव कुटे, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, इंद्रजीत थोरात, रणजीतसिंह देशमुख, सुनील कडलग, कैलासराव पानसरे, मनीष गोपाळे, सुरेश कान्होरे, सतीश खताळ, दिपाली वर्पे, अनिल घुगे, सखाराम शरमाळे, निलेश कडलग, मनसुख भंडारी, निसार शेख, सचिन करपे उपस्थित होते. सभेच्या नोटीसचे वाचन सतीश गुंजाळ यांनी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 481
बाळासाहेब थोरात वार्षिक सभा संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.