Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पाच लाखांवरील उपचारांसाठी कॉर्पस निधीची तरतूद, जनआरोग्य योजनेतील उपचारांची संख्या वाढणार; योजनेअंतर्गत आता २३९९ उपचार
आरोग्य

पाच लाखांवरील उपचारांसाठी कॉर्पस निधीची तरतूद, जनआरोग्य योजनेतील उपचारांची संख्या वाढणार; योजनेअंतर्गत आता २३९९ उपचार

आतापर्यंत १३५६ असलेले उपचारांचे पॅकेज वाढवून २,३९९ करण्यात आले आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई – 

राज्यातील सामान्य नागरिकांना मोठा दिलासा देत, एकत्रित ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने’ अंतर्गत नवीन २,३९९ उपचारांचा समावेश करण्यास आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. याशिवाय, पाच लाखांपेक्षा अधिक खर्च असलेल्या अवयव प्रत्यारोपणासारख्या गंभीर उपचारांसाठी वेगळा ‘कॉर्पस निधी’ (Corpus Fund) निर्माण करण्याचा महत्त्वाचा निर्णयही घेण्यात आला.

आज ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या नियामक परिषदेच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे उपस्थित होते.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या. ते म्हणाले की, योजनेतील उपचार आणि रुग्णालयांची संख्या वाढवल्यामुळे जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळेल. आतापर्यंत १३५६ असलेले उपचारांचे पॅकेज वाढवून २,३९९ करण्यात आले आहेत.

पाच लाखांपेक्षा जास्त खर्चाच्या उपचारांसाठी, जसे की हृदय, फुफ्फुस, किडनी किंवा बोन मॅरो प्रत्यारोपण, आता स्वतंत्र निधी उपलब्ध असेल. प्रत्येक तालुक्यात ३० खाटांचे रुग्णालय असावे. नसलेल्या तालुक्यात कमी खाटांच्या रुग्णालयांना सहभागी करून घेऊन त्यांना वेगळ्या पद्धतीने देयके अदा करण्याची व्यवस्था करावी. ग्रामीण भागात योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘आरोग्य मित्र’ यांची संख्या वाढवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योजनेच्या माहितीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना केली. ते म्हणाले, योजनेतील उपचार, रुग्णालये आणि लाभांची माहिती देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (Artificial Intelligence) आधारित ॲप आणि चॅटबॉट तयार करावेत. यामुळे लोकांना माहिती सहज उपलब्ध होईल. तसेच, रुग्णालयांना वेळेत देयके अदा करावीत जेणेकरून रुग्णांना दर्जेदार उपचार मिळतील असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत घेतलेल्या इतर महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:

  • प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर करता येतील अशा २५ नवीन उपचारांचा समावेश.
  • सर्व ग्रामीण आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचा योजनेत समावेश.
  • उपचारांच्या दर निश्चितीला मान्यता.
  • रुग्णालयांना श्रेणीनुसार दर देण्याची पद्धत बंद करून गुणवत्ता प्रमाणपत्रधारक रुग्णालये आणि आकांक्षित जिल्ह्यांतील रुग्णालयांना अधिकची रक्कम देण्याचे धोरण.
  • समग्र यादीतील राज्याचे ४३८ उपचार टीएमएस २.० प्रणालीशी सुसंगत करणार.

या निर्णयामुळे राज्यातील जनतेला आरोग्य सुविधा सहज आणि परवडणाऱ्या दरात मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 520
देवेंद्र फडणवीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती हल्ला; ‘नार्को टेस्ट’चे दिले आव्हान, शेतकरी कर्जमाफीची घोषणाही ठरवली फसवी

10/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.