Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सोनांबेकर हॉस्पिटलवर पुन्हा वैद्यकीय हलगर्जीपणाचा आरोप; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याने पतीची पोलिसांत धाव, गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांच्या अडचणीत वाढ!
आरोग्य

सोनांबेकर हॉस्पिटलवर पुन्हा वैद्यकीय हलगर्जीपणाचा आरोप; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याने पतीची पोलिसांत धाव, गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांच्या अडचणीत वाढ!

पोलीस आणि संबंधित आरोग्य विभाग या तक्रारीवर काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर

संगमनेर येथील डॉ. सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान झालेल्या हलगर्जीपणामुळे आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप एका पीडित पतीने केला आहे. यामुळे आधीच एका प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.

रोहीदास गणपत डोंगरे (रा. निमज, ता. संगमनेर) यांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशनसह जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे लेखी तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. याप्रकरणी होणाऱ्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.

तक्रारदार डोंगरे यांनी दिलेल्या केलेल्या तक्रारीनुसार, त्यांची पत्नी मिना डोंगरे यांना छातीचा त्रास होत असल्याने २८ जानेवारी २०२६ रोजी डॉ. सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे डॉ. कोरडे यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. दाखल केल्याच्या दिवशीच त्यांची एन्जिओग्राफी करण्यात आली आणि त्यानंतर २४ तासांच्या आत ८० टक्के ब्लॉक असल्याचे सांगून त्यांची एन्जिओप्लास्टी करण्यात आली. 

मात्र, एन्जिओप्लास्टीनंतर रुग्णाची प्रकृती सुधारण्याऐवजी खालावत गेली. या काळात रुग्णाला सतत चक्कर येत होती आणि उलट्यांचा त्रास होत होता, तरीही डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

हॉस्पिटलमधील नियोजनावर ताशेरे ओढताना डोंगरे यांनी नमूद केले की, ३० जानेवारी रोजी सकाळी डॉक्टरांनी एम.आर.आय. करण्याची सूचना दिली होती. मात्र दुपारपर्यंत हॉस्पिटल प्रशासनाने त्याबाबत कोणतीही हालचाल केली नाही. नातेवाईकांनी चौकशी केली असता संगमनेरमधील दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गर्दी असल्याचे सांगून वेळ मारून नेण्यात आली.

अखेर नातेवाईकांनी स्वतः बाहेरून रुग्णवाहिका बोलावून एम.आर.आय. केला. या विलंबामुळे रुग्णाची अवस्था अधिकच गंभीर झाली. तसेच आयसीयूमध्ये असताना युरिन कॅथेटर निखळल्याने बेड ओला झाला होता आणि रुग्णाला उलट्या झाल्या असतानाही स्टाफने स्वच्छता केली नाही, असा संतापजनक अनुभवही नातेवाईकांनी मांडला आहे.

रुग्णाची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर ३० जानेवारी रोजी सायंकाळी डॉक्टरांनी त्यांना नाशिक येथील सोपान हॉस्पिटलमध्ये हलवण्यास सांगितले. तेथे नेल्यानंतर करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये रुग्णाला न्यूमोनियाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये न्यूमोनियाकडे दुर्लक्ष करून इतरच उपचार करण्यात आले, असा दावा डोंगरे यांनी केला आहे. दुर्दैवाने उपचारादरम्यान ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मिना डोंगरे यांचा मृत्यू झाला.

या सर्व प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी रोहीदास डोंगरे यांनी केली आहे. त्यांनी हॉस्पिटलमधील त्या काळातील सीसीटीव्ही फुटेज जतन करण्याची आणि उपचाराशी संबंधित सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची विनंती पोलिसांना केली आहे. 

या घटनेमुळे संगमनेरमधील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून पोलीस आणि संबंधित आरोग्य विभाग या तक्रारीवर काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,652
पोलीस तक्रार रोहिदास डोंगरे सोनांबेकर हॉस्पीटल
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

By Annant Ppangarkar28/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर: नेवासा तहसील कार्यालयाच्या आवारात भरदुपारी वकिलावर गोळ्या झाडून…

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

28/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.