Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कंटेनर हॉटेलमध्ये घुसला, हॉटेलचे मोठे नुकसान
अपघात

कंटेनर हॉटेलमध्ये घुसला, हॉटेलचे मोठे नुकसान

या अपघातामुळे हॉटेल मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/09/2025Updated:16/09/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – 

सोमवारी पहाटे पुणे-नाशिक महामार्गावर रायतेवाडी फाटा येथे एक भरधाव वेगातील कंटेनर हॉटेलमध्ये शिरल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असले तरी, सुदैवाने हॉटेल मालक बचावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून पुण्याकडे जात असलेल्या एका भरधाव कंटेनरच्या (क्रमांक HR 55 AT 2926) चालकाला झोपेची डुलकी लागली. यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर थेट महामार्गालगतच्या ‘हॉटेल दिव्यांका’ मध्ये शिरला. हा अपघात पहाटे ५ ते ५:१५ च्या सुमारास घडला.

ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी हॉटेलचे मालक दत्तात्रेय मांडेकर हॉटेलच्या आत झोपले होते. मोठा आवाज झाल्याने त्यांना जाग आली आणि समोरचे दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी आरडाओरडा केल्यावर परिसरातील लोक जमा झाले. अपघातात हॉटेलच्या सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या मदतीने कंटेनर बाहेर काढण्यात आला असून, चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. या अपघातामुळे हॉटेल मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,269
अपघात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

माजी खासदारावर गुन्हा दाखल

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.