संगमनेर-
पुणे-नाशिक महामार्गावर खांडगावकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर मंगळवारी रात्री एक भीषण अपघात घडला. मालवाहू ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दिनेश राजू लोखंडे (वय ३३, रा. संगमनेर खुर्द) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कामावरून घरी परतत असताना काळाने त्याच्यावर घाला घातला.
या घटनेने संगमनेर परिसरात शोककळा पसरली आहे. दिनेश लोखंडे हा मालपाणी कंपनीत कामाला होता. मंगळवारी रात्री तो नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवरून घरी परतत होता. त्याचवेळी, अहमदाबादहून पुण्याकडे जाणाऱ्या (MH 14 LS 7191) या ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दिनेशच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्याचा डावा पाय पूर्णपणे तुटला होता.
अपघाताची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दिनेशला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.
या अपघातामुळे लोखंडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दिनेशच्या पश्चात त्याचे वडील राजू, आई मनीषा, पत्नी मनीषा, मुलगा महादू आणि मुलगी श्रेया असा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, संगमनेर शहर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, पुढील तपास महिला पोलीस मीरा बिबवे करत आहेत.
पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेरमध्ये भीषण अपघात, तरुण दुचाकीस्वार जागीच ठार